Satara ZP Election 2026: मकरंद पाटलांसाठी बाजीप्रभूप्रमाणे खिंड लढवू म्हणाले, तोच सकाळी 'झेडपी'चे माजी उपाध्यक्ष भाजपमध्ये गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 17:57 IST2026-01-30T17:55:29+5:302026-01-30T17:57:05+5:30

खंडाळा तालुक्यातील हाय व्होल्टेज लढतीमध्ये शिरवळ जिल्हा परिषद गटाच्या लढतीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष

Former Zilla Parishad Vice President Nitin Bhargude-Patil, who said he would fight for Makarand Patil like Baji Prabhu joined BJP | Satara ZP Election 2026: मकरंद पाटलांसाठी बाजीप्रभूप्रमाणे खिंड लढवू म्हणाले, तोच सकाळी 'झेडपी'चे माजी उपाध्यक्ष भाजपमध्ये गेले

Satara ZP Election 2026: मकरंद पाटलांसाठी बाजीप्रभूप्रमाणे खिंड लढवू म्हणाले, तोच सकाळी 'झेडपी'चे माजी उपाध्यक्ष भाजपमध्ये गेले

शिरवळ : खंडाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यातील शीतयुद्धाने रणांगण तापले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी तर कमालच केली.

संध्याकाळी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मकरंद पाटील यांच्यासाठी बाजीप्रभूप्रमाणे खिंड लढवू म्हणाले. तेच भरगुडे-पाटील यांनी दुसऱ्याच दिवशी नाट्यमयरीत्या भाजपचे जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश केला. त्यामुळे भाजपमधील मातब्बरांचे इच्छुकांचे पत्ते कट झाले.

खंडाळा तालुक्यातील हाय व्होल्टेज लढतीमध्ये शिरवळ जिल्हा परिषद गटाच्या लढतीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या गटामध्ये माजी अध्यक्ष व माजी उपाध्यक्ष, तसेच शिरवळ पंचायत समिती गणांमध्ये दोन माजी सरपंचांमध्ये होणारी लढत जिल्ह्यामध्ये लक्षवेधी ठरणार आहे.

स्वयंघोषित नेत्याच्या नेहमीप्रमाणे वल्गना 

पुण्यात एका राजकीय पक्षाचा प्रचारक असणाऱ्या व काचांना ब्लँक फिल्मींग लावत हा नेता वावरतो. मात्र, सातारा जिल्ह्यात दुसऱ्या पक्षाचे बॅनर लावणाऱ्या स्वयंघोषित नेत्याच्या नेहमीप्रमाणे वल्गना चालू आहेत. त्यांच्या अनेक गोष्टींची खमंग चर्चा शिरवळ गटात सुरू आहे.

Web Title: Former Zilla Parishad Vice President Nitin Bhargude-Patil, who said he would fight for Makarand Patil like Baji Prabhu joined BJP