शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी तालुका दूध संघाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST

रामापूर : ‘पाटण तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावे, यासाठी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटण तालुका सहकारी ...

रामापूर : ‘पाटण तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावे, यासाठी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटण तालुका सहकारी दूध संघाची निर्मिती केली. दूध संघाची यशस्वी घोडदौड सुरू असून, सहकारी संस्थेच्या माध्यमातून काय घडू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण पाटण तालुका दूध संघाकडे पाहिल्यावर समजते. दूध संघाने राबविलेला प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांना फायदा होईल,’ असा विश्वास पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी व्यक्त केला.

पाटण तालुका सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ, पाटण (सोनगाव) तसेच राष्ट्रीय कृषी बँक व विकास बँका नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दूध उत्पादक शेतकरी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चितळे डेअरीचे डॉ. एच. आर. इंगळे, मार्गदर्शक आर. बी. राजपुते, पाटण अर्बन बँकेचे अध्यक्ष दिनकरराव घाडगे, दूध संघाचे संचालक सुभाष पवार, पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा स्नेहल जाधव, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा रोहिणी पाटील, पाटणच्या पशुधन विस्तार अधिकारी विद्या झंजाळ, पशुवैद्यकीय अधिकारी संदीप जाधव, सांगलीचे प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी मकरंद पाटील व अर्चना पाटील यांची उपस्थिती होती.

शेलार म्हणाले, ‘कोरोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या. मात्र पंचायत समितीद्वारे शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांसाठी जी काही मदत लागेल ती आपण करू. हे प्रशिक्षण केवळ तुमच्यापुरते मर्यादित न ठेवता पुढील शेतकऱ्यांसाठी त्याचा कसा उपयोग होईल, हे पाहावे.’

कार्यक्रमास उपाध्यक्ष शांताराम सूर्यवंशी, संचालक आबासाहेब शिंदे, विकास शिलवंत, आप्पा मोळावडे, अच्युतराव कदम, विठ्ठल जाधव, भागोजी लांबोर, सुंदर पुजारी, रघुनाथ दंडीले, आक्काताई काळे, विठ्ठल पवार उपस्थित होते. सुभाष पवार यांनी प्रास्ताविक केले. संचालक अशोकराव मोरे यांनी स्वागत केले. व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी यांनी आभार मानले.

फोटो ०७रामापूर-दूध संघ

पाटण येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात राजाभाऊ शेलार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दिनकरराव घाडगे, डॉ. एच. आर. इंगळे, बबनराव कांबळे, विद्या झंजाळ उपस्थित होते. (छाया : प्रवीण जाधव)