शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वनसंपदा अन् वन्यजिवांची वणव्यात होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST

कुडाळ : जावळीचा भूभाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला प्रदेश. या ठिकाणच्या जंगलात नानाविध दुर्मीळ वनस्पती आहेत. हा भाग शेकडो ...

कुडाळ : जावळीचा भूभाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला प्रदेश. या ठिकाणच्या जंगलात नानाविध दुर्मीळ वनस्पती आहेत. हा भाग शेकडो वन्यजिवांचे आश्रयस्थान आहे. मात्र, या डोंगरांवर वारंवार लागत असलेल्या वणव्यांमुळे येथील वनसंपदा आणि वन्यजिवांना धोका पोहोचत असून, दुर्मीळ वनस्पती नामशेष होत आहे. हा अधिवास टिकून राहावा, यासाठी वनविभागाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

तालुक्याचा पश्चिम भाग डोंगर-दऱ्यांनी वेढलेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात वणवे लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. नैसर्गिक वणव्यांपेक्षा मानवनिर्मित वणव्यांचीच चर्चा अधिक आहे. वैराटगडचा परिसर, दिवदेवचा डोंगर, कुसुंबीचा डोंगरमाथा, कास, बामणोली, आदी भागांत अनेकदा वणवे लागतात. वनविभागामार्फत या परिसरात अनेक ठिकाणी झाडे लावली आहेत. दाट जंगलाच्या ठिकाणी वन्यप्राण्यांची राहुटी असते. येथे बिबट्या, तरस, वाघ, लांडगे, भेकर, अस्वल आदी जंगली प्राणी याठिकाणी आढळतात. वणव्यात या साऱ्यांचीच हानी होत आहे.

जावळी तालुका दुर्गम असून, या तालुक्याला समृद्ध वनसंपदा लाभली आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून येथील जंगलात, डोंगरमाथ्यांवर व पठारावर वणवे लावण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. वणवे लावणाऱ्या विघ्नसंतोषींवर वनविभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

(चौकट)

अधिवास संकटात

प्राण्यांना चराईसाठी गवताची चांगली वाढ व्हावी, शेतातील पीक बदल व्हावा म्हणून स्थानिक शेतकरी शेती भाजतात. याची झळ जंगलांना पोहोचत आहे. आगीच्या वणव्यात जंगलांची अपरिमित हानी होत आहे. यामुळे या अधिवासात राहणारे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत.

(कोट)

निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वनसंपदेची जपणूक होणे आज काळाची गरज आहे. वनविभागामार्फत वणव्याची शक्यता लक्षात घेऊन ठिकठिकाणी जाळपट्टेही काढले जातात. मात्र, मानवनिर्मित वणव्याने येथील बहुतांश वनसंपदा नष्ट होत आहे. वन्यजिवांचा अधिवास नाहीसा होत असल्याने मानवी वस्तीवर याचे दर्शन घडत आहे. यासाठी वणवा लावणाऱ्या विघातक प्रवृत्तीला आळा घालणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.

- अंकुश शिंदे, वन कर्मचारी.

फोटो : १६ वणवा