शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

पाच-सहा वर्षांत येरळा नदी बारमाही प्रवाही होईल

By admin | Updated: May 13, 2015 00:55 IST

राजेंद्रसिंह राणा : मास्टर प्लॅन तयार करुन काम करा

पुसेगाव : खटाव तालुक्यातील पर्जन्यमान, भौगोलिक परिस्थिती, मातीची पाणी पकडून ठेवण्याची क्षमता. तसेच येरळा नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा मास्टर प्लॅन तयार करून एकजुटीने काम केल्यास कायमस्वरूपी दुष्काळाचा ठपका असणाऱ्या या भागातील येरळा नदी पाच-सहा वर्षांत बारमाही प्रवाही वाहू लागेल,’ असा विश्वास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केला. पुसेगाव, ता. खटाव येथे संत समाज, शासन व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने येरळा नदीचे पुनरुज्जीवन कार्यक्रमाच्या चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल होते. यावेळी उपजिल्हाधिकारी पराग सोमन, श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सातारा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, सभापती प्रभावती चव्हाण, पंचायत समिती सदस्य मोहनराव जाधव, सरपंच मंगल जाधव, विशस्त अ‍ॅड. विजयराव जाधव, तहसीलदार धाइंजे, गटविकास अधिकारी शिंदे, भूमी अभिलेख उपअधीक्षक पवार, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मानाजीराव घाडगे, बाळासाहेब इंगळे, शामराव जाधव, सुभाषराव जाधव, प्रा. टी. एन. जाधव, अभयराजे घाटगे, राजेंद्र घाटगे, प्रकाश जाधव, सुधीर जोशी, प्रा. मुरलीधर साळुंखे आदी उपस्थित होते. डॉ. सुरेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. मोहन गुरव यांनी सूत्रसंचलन केले. प्रकाश जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर) माणसांच्या चुकांमुळे नैसर्गिक संपत्ती नष्ट...राजस्थानसारख्या वाळवंटी भागात केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी जलबिरादरीच्या माध्यमातून सात नद्या बारमाही प्रवाही करून खऱ्या अर्थाने जलक्रांती केली आहे. हिंंदू संस्कृतीची जलापासून उत्पत्ती झाली आहे. मनुष्यांच्या चुकामळे नदी, तलाव व ओढे ही नैसर्गिक संपत्ती कायमची नष्ट होत चालली आहे. यामुळेच पाण्याचे स्त्रोत कमी होत चाललेले आहेत. याकरिता त्यामधील गाळ, झाडे-झुडपे, अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले.