शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Satara: दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या कोल्हापुरातील पाचजणांच्या मुसक्या आवळल्या, शिरवळ पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 17:19 IST

सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

मुराद पटेल

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला शिरवळ पोलिसांनी रात्रगस्ती दरम्यान ताब्यात घेतले. तौसिफ दस्तगीर बागवान (वय-२३), कृष्णात प्रकाश पोतेकर (२६), आकाश अंकुश घाडगे (२५), विक्रम दीपक सोनवले (२२), सुरज महादेव पाटील (२५, सर्व रा. इचलकरंजी ता.हातकणंगले जि. कोल्हापूर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील गंभीर घटना रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी गस्त वाढवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दरम्यान शिरवळ पोलिसांना रात्रग्रस्तवेळी महामार्गालगत एका ऑटोमोबाईल दुकानाशेजारी कार व काही युवक थांबल्याचे दिसले. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने मदतीसाठी आणखी पोलिस कर्मचारी बोलावून संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी पळून जाणाऱ्या दोघांचा पाठलाग करून ताब्यात घेत विचारपूस केली. या युवकांकडून लोखंडी कटर, लोखंडी कटावणी, मिरची पूड, मोबाईल अशा संशस्यास्पद वस्तू मिळून आल्याने हे युवक रामेश्वर ऑटो गॅरेज या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे असणारी कार व साहित्य असा एकूण ३ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शिरवळ पोलिसांकडून हस्तगत करण्यात आला.ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, सहाय्यक फौजदार धरमसिंग पावरा, पोलीस अंमलदार नितीन नलावडे, गिरीश भोईटे, विजय शिंदे, अजित बोराटे, संग्राम भोईटे, सुरज चव्हाण व गृहसुरक्षा दलाचे जालिंदर वेळे, रामदास ननावरे यांनी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस