शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाईन’द्वारे पाच लाखांचा गंडा

By admin | Updated: August 30, 2015 00:22 IST

सांगलीतील घटना : लखनौच्या अविनाशकुमारच्या खात्यावर रक्कम जमा

सांगली : येथील रेल्वे स्टेशनजवळील मयूर हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या वैशाली भैरव पाटील यांना आॅनलाईन बॅँकिगद्वारे पाच लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. आयसीआयसीआय बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत पाटील यांचे खाते असून, तेथून ही रक्कम आॅनलाईन काढण्यात आली. १९ डिसेंबर २०१४ रोजी हा प्रकार घडला आहे. ही रक्कम उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ शहरातील अविनाशकुमार याच्या स्टेट बँक खात्यामध्ये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वैशाली पाटील या सिंगापूर येथील एका कंपनीत नोकरीस आहेत. त्या तिथेच राहतात; पण त्यांचे आयसीआयसीआय बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत खाते आहेत. त्यांचे बँकेचे सर्व व्यवहार त्यांच्या बहिणीचे पती दिलीपसिंह आनंदराव पवार (रा. मयूर हौसिंग सोसायटी, सांगली) हे पाहतात. १९ डिसेंबर २०१४ रोजी वैशाली यांच्या खात्यामधून ४ लाख ९८ हजारांची रक्कम काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला. वैशाली यांनी हा प्रकार पाहन भाऊजी दिलीपसिंह पवार यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांनी मी बँकेतून एक पैसाही काढला नसल्याचे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी स्वत: बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी आॅनलाईनद्वारे ही रक्कम काढल्याची माहिती मिळाली. एका दिवसात एवढी रक्कम दुसऱ्याच व्यक्तीने काढल्याचे समजताच पाटील यांना धक्का बसला. त्यांनी याबाबत बँकेच्या व्यवस्थापकांकडे तक्रार केली. गेल्या आठ महिन्यांपासून बँक प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु होती. चौकशीत वैशाली पाटील यांच्या बँक खात्यावरून काढलेली ही रक्कम उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ शहरातील अविनाशकुमार नामक व्यक्तीच्या स्टेट बँकेच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. आॅनलाईनद्वारे ही रक्कम अविनाशकुमारने हस्तांतर करून घेऊन गंडा घातल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये बँक प्रशासनाने आमची कोणतीही चूक नसल्याचे सांगितले. त्यामुळे तब्बल आठ महिन्यांनंतर वैशाली पाटील यांच्यातर्फे दिलीपसिंह पवार यांनी शनिवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल चोरमले तपास करीत आहेत. निरीक्षक चोरमले यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, गुन्हा आज दाखल केला आहे. आयसीआयसीआय बँकेमधून तपासाला सुरुवात केली जाईल. आठ महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रकार आहे. संशयितापर्यंत पोहोचण्यासाठी बारकाईने तपास केला जाईल. तपासाची व्याप्ती उत्तर प्रदेश राज्यापर्यंत जाणार आहे. संशयित अविनाशकुमार नामक व्यक्ती कोण, हे पाहिले जाईल. यासाठी लखनौच्या स्टेट बँकेत संपर्क साधला जाईल. कदाचित ही व्यक्ती बोगस असू शकते. तपासात या सर्व बाबी उजेडात आणल्या जातील. (प्रतिनिधी)