साठेवाडीत पाटाच्या पाण्यावरून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:40 IST2021-05-18T04:40:34+5:302021-05-18T04:40:34+5:30

सातारा : सातारा तालुक्यातील साठेवाडी येथे पाण्याच्या पाटावरून मारामारी झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला. ...

Fighting over flood waters in Sathewadi | साठेवाडीत पाटाच्या पाण्यावरून मारामारी

साठेवाडीत पाटाच्या पाण्यावरून मारामारी

सातारा : सातारा तालुक्यातील साठेवाडी येथे पाण्याच्या पाटावरून मारामारी झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला.

योगेश केशव जाधव, सचिन केशव जाधव, केशव निवृत्ती जाधव, राहुल केशव जाधव (रा. सोनगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत राहुल रघुनाथ कदम (वय २३, रा. साठेवाडी, पो. सोनगाव, ता. सातारा) याने तक्रार दिली आहे. साठेवाडी येथे शेतामध्ये असणाऱ्या पाण्याच्या पाटावरून योगेश जाधव याने राहुल कदम याच्या पाठीवर आणि मांडीवर लाकडी काठीने मारहाण केली. यावेळी राहुल याच्या हातातील मोबाईल फोडून टाकत शिवीगाळ केली. याचवेळी सचिन जाधव याने राहुल याला हात आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. केशव जाधव, राहुल जाधव या दोघांनी राहुल कदम याला शिवीगाळ, दमदाटी केली. अधिक तपास पोलीस हवालदार दीपक बर्गे करत आहेत.

Web Title: Fighting over flood waters in Sathewadi