शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याशी हुज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

सातारा : अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जप्त केल्याने आरटीओ कार्यालयासमोरील एका एजंटाने अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी ...

सातारा : अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जप्त केल्याने आरटीओ कार्यालयासमोरील एका एजंटाने अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापतही झाली. दरम्यान, अतिक्रमण पथकाने गुरुवारी दिवसभरात ८० फ्लेक्स बोर्ड जप्त केले.

सातारा शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्डमुळे शहराचे रूप बकाल होऊ लागले आहे. प्रमुुख मार्ग, चौक, फूटपाथ तसेच गल्लीबोळातही वेगवेगळ्या जाहिरातींचे तसेच शुभेच्छांचे फलक विनापरवाना लावण्यात आले आहेत. अशा फुकट्या जाहिरातदारांमुळे पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल मात्र बुडत आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेत ‘लोकमत’मध्ये ‘विनापरवाना फ्लेक्स बोर्डमुळे शहराचे विद्रुपीकरण’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. याची तातडीने दखल घेत पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी शहरातून तब्बल २२१ फ्लेक्स बोर्ड जप्त केले, तर गुरुवारी आरटीओ कार्यालय, भूविकास बॅँक चौक, बसस्थानक व पोवईनाका या मार्गावरील ८० फ्लेक्सबोर्ड जप्त करण्यात आले.

दरम्यान, आरटीओ कार्यालयासमोर रस्त्यावरील फ्लेक्स बोर्ड जप्त करताना एका एजंटाने अतिक्रमणच्या कर्मचाऱ्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या शाब्दिक वादावादीनंतर एजंटाने कर्मचाऱ्याच्या हातून फ्लेक्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत कर्मचाऱ्याला हाताला दुखापत झाली. अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम यांनी या घटनेची माहिती पोलीस कर्मचाऱ्याना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत संबंधित एजंट तेथून निघून गेला.

(चौकट)

पोलीस संरक्षणाची गरज

अतिक्रमण हटविण्याच्या कारणावरून पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण, धक्काबुक्की, दमदाटी करण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविणे गरजेचे आहे.

फोटो : ०७ जावेद ०७

सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी आरटीओ कार्यालयाच्या आवारातील अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जप्त केले. (छाया : जावेद खान)