शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास ग्रामपंचायतींसाठी लढती; सात गावे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यामध्ये ५३४ जणांनी माघार घेतल्याने ८८८ जण शिल्लक राहिले ...

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यामध्ये ५३४ जणांनी माघार घेतल्याने ८८८ जण शिल्लक राहिले आहेत. १३१ जागांसह तालुक्यातील सात गावे बिनविरोध झाली आहेत. ५० ग्रामपंचायतींसाठी ३२० जागांसाठी लढत होत असून, ७५७ उमेदवार मैदानात उतरले आहेत,’ अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दशरथ काळे यांनी दिली.

खंडाळा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली. ४६१ जागांसाठी १४२२ अर्ज वैध झाले होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ५३४ अर्ज माघार घेण्यात आले आहेत. यामध्ये लढतीच्या जागा व उमेदवार यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. अजनुज १ (२), अंबारवाडी २ (४), बावडा ११ (२२), पारगाव १० (२२), केसुर्डी ७ (१७), घाटदरे ६ (१२), धावडवाडी ८(२०), कण्हेरी ७ (१६), म्हावशी ४ (१०), अहिरे ९ (१९), मोर्वे ९ (२७), झगलवाडी १ (२), लोहोम ६ (१२) , कर्नवडी ३ (७), नायगाव ९ (१९), सांगवी ४ (८), वडगाव ६ (१२), जवळे ९ (१९), कवठे ६ (१२), शिंदेवाडी ९ (२४), राजेवाडी ६ (१४), भाटघर ४ (९), विंग ९ (२६), गुठाळे २ (४), मिरजे ५ (११), अतिट ५ (१०), कोपर्डे ९ (१८), निंबोडी ९ (१८), बोरी ९ (१८), पाडळी ९ (१८), सुखेड ९ (१९), पिंपरे बुद्रुक ९ (१७), बावकलवाडी २ (४), मरिआईचीवाडी ७ (१४), पाडेगाव ४ (८), बाळूपाटलाचीवाडी ७ (१४), खेड बुद्रुक ११ (२४), पिसाळवाडी २ (४), धनगरवाडी २ (४), अंदोरी १० (२०), वाघोशी ७ (१४), भादवडे १ (२), शिवाजीनगर ९ (१८), शेखमिरेवाडी ४ (८), लोणी ७ (१४), तोंडल ४ (८), भोळी ९ (१९) , भादे ११ (३०), वाठार बुद्रुक ८ (१८), शेडगेवाडी ४ (८).

घाडगेवाडी येथील २, धनगरवाडीतील २, कण्हेरीतील १, पिसाळवाडीतील २, राजेवाडी, सांगवी, भाटघर येथील एक जागा रिक्त आहे.

॥ बिनविरोधचा सत्ता

तालुक्यातील सात गावे बिनविरोध झाली असून, यामध्ये पळशी, कराडवाडी, वाण्याचीवाडी, लिंबाचीवाडी, हरळी, कान्हवडी, घाडगेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. घाडगेवाडी गावातील उमेदवारांनी अर्ज माघारीच्या शेवटच्या दोन मिनिटांत बैठक घेतली. केवळ एक मिनिटात बिनविरोधचा निर्णय घेतला. त्यामुळे गावातीला संघर्ष टळला . ...............................................

फोटो - अर्ज माघारीसाठी गर्दी