शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

Satara: पाण्यावर खर्च पाच लाख; तरी स्वप्नांची राख!; दुष्काळासाठी शासनाची दमडीची नाही मदत 

By नितीन काळेल | Published: May 23, 2024 7:29 PM

फळबागांसाठी सोलापूर जिल्ह्यातून विकतचे पाणी

सातारा : माणमध्ये चार-पाच वर्षांतून दुष्काळ ठरलेलाच. त्याचप्रमाणे आताही पाणी, चाऱ्याचा प्रश्न आहे. हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब आणि आंब्याची बाग पोसण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणावे लागतेय. मक्याला गुंठ्याला चार हजार मोजावे लागतात. त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांचा यावरच चार-पाच लाखांपर्यंत खर्च झालाय. तरीही उत्पन्नाबाबत ठेंगाच आहे. त्यातच दुष्काळ असूनही शासनाकडून दमडीचीही मदत झाली नसल्याचा आरोप होत आहे.माण तालुक्याचा तसेच सातारा जिल्ह्याचाही पूर्व भाग म्हणजे हवालदारवाडी, कारखेल ही गावे. या भागात फळबागांचे प्रमाण अधिक आहे. येथील शेतकरी कष्टाळू. त्यामुळे एकेकाच्या पाच, दहा एकरापर्यंतही डाळिंब आणि आंब्याच्या बागा आहेत; पण या बागांना दृष्ट लागली आहे. कारण गेल्यावर्षी पाऊस झाला नसल्याने दुष्काळ पडला. विहिरी आटल्या. पाणी नसल्याने बागा वाळू लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यासाठी गावाच्या शेजारीच सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. शेजारील माळशिरस तालुक्यात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे हे शेतकरी सुमारे १५ किलोमीटर अंतरावरून सोलापूर जिल्ह्यातून विकत पाणी आणत आहेत. साडेतीन हजार रुपयांना ३० हजार लिटरचा टॅंकर मिळतोय. मागील काही महिन्यांपासून पाण्यावरच पाण्यासारखा पैसा खर्च होत आहे, तरीही फळबागातून चांगले उत्पन्न मिळेलच, याची शास्वती नाही.हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकरी उद्धव उदंडे यांची सात एकर आंबा, तर डाळिंबाची अडीच एकर बाग आहे. या बागा जगविणे आणि जनावरांसाठी दररोज एक पाण्याचा टॅंकर लागतोय. आतापर्यंत त्यांचा पाण्यावर पाच लाख रुपये खर्च झाला आहे. तरीही त्यांना आंब्यातून फक्त चार ते साडेचार लाख रुपयेच उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. त्यांचा आतापर्यंत खत, मजुरी, पाणी, औषधावर १० लाखांपर्यंत खर्च झाला आहे. झाडे जपली पाहिजेत. ती वाळवून परत काय करायचे असे म्हणत खर्च करावाच लागतो. पुढील वर्षी चांगले उत्पन्न मिळेल असे ते सांगतात. कारण, यंदा आंबा उन्हाने खराब झालाय, तसेच पुरेसे पाणी न मिळाल्याने झाडे वाळू लागली आहेत. फक्त सध्या झाडे जगविण्याचेच काम सुरू आहे. अशीच स्थिती परिसरातील अनेक शेतकऱ्यांची झालेली आहे, तरीही शासन मदत करत नाही, अशी खंतही हे शेतकरी व्यक्त करीत आहेत.

जमीन ५० एकर अन् विहिरी पाच...येथील शेतकरी हणमंत तुकाराम फडतरे यांची जवळपास ५० एकर जमीन आहे. त्यातील ४० एकर बागायत. त्यासाठी पाच विहिरी आहेत; पण आतापर्यंत आंबा आणि डाळिंबासाठी पाणी विकत घ्यावे लागले. त्यावर दोन लाख रुपये खर्च झाला आहे.

६० किलोमीटरवरून चारा; दुधाचे पैसे त्यावर खर्च..माण तालुक्यातच ओला चारा मिळत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी सुमारे ६० किलोमीटर अंतरावरील सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीतून हिरवा चारा विकत आणला आहे. त्यावर दुभती जनावरे आहेत. दुधाचे पैसे चाऱ्यावर अशीच शेतकऱ्यांची धारणा झालेली आहे, तर जनावरांच्या किमतीही कमी झाल्या आहेत. सव्वा लाखाची गाय ६० हजारांना मागण्यात आली, असेही एका शेतकऱ्याने सांगितले.

गावात दुष्काळ पडला आहे. परिसरात कोठेही पाणी नाही. सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणून बागा जगवत आहे; पण उत्पन्न कमी असल्याने तोटाच होणार आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असून मदत मिळायला हवी. तसेच बागांचा विमाही भरलाय. त्यातून तरी मदत व्हावी; पण आतापर्यंत काहीच मदत मिळालेली नाही. बागा वाळवून चालत नाही म्हणून पाण्यावर खर्च करावा लागत आहे. - उद्धव उदंडे, शेतकरी

कारखेल गावाला दिवाळीपासून टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. गावातील ५०० फूट खोलवरील बोअरलाही पाणी नाही. माझी १० एकर डाळिंब बाग असून माळशिरस तालुक्यातून पाणी विकत आणतोय. आतापर्यंत पाण्यावरच तीन लाख रुपये खर्च झाला आहे. बाग जाळून चालत नाही. फळबागांचा विमा भरला आहे, त्यातून तरी शेतकऱ्यांना मदत व्हावी हीच मागणी आहे. - शशिकांत गायकवाड, सरपंच कारखेल

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीWaterपाणीSolapurसोलापूर