शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोचे दर गडगडल्याने शेतकरी ‘लाली लाल’

By admin | Updated: August 27, 2015 23:05 IST

खंडाळा तालुक्यात दुहेरी संकट : भांडवल निघणेही मुश्किल

खंडाळा : यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दिलेली ओढ त्यामुळे शेतीपाण्याचा गंभीर बनत चाललेला प्रश्न आणि दुसरीकडे शेतीमालाचे गडगडलेले दर यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक बळ देणारं खरीप हंगामातील पीक म्हणून टोमॅटोकडे पाहिले जाते; परंतु यावर्षी टोमॅटोचे दर एवढे ढासळले की, पिकाचे घातलेले भांडवलही निघणे मुश्किल बनले आहे.जून महिन्यापासून येणारा मोसमी पाऊस आलाच नाही, पावसाने चांगलीच ओढ दिली. आता परतीच्या मान्सूनचाही तपास नाही. त्यामुळे चहू बाजूच्या विहिरी, तलाव आटू लागले आहेत. खरीप हंगामातील बहुतांशी पिकांची पेरणी झाली खरी; पिकांनी डोके वर काढण्याअगोदरच ती कोमेजली आहेत.खंडाळा तालुक्यातील बागायती पट्ट्यात विहिरींच्या पाण्यावर टोमॅटो, भेंडीसारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात; परंतु यावर्षी टोमॅटोचे भाव पुरते ढासळले आहेत. प्रतिकिलो सरासरी पाच रुपये सुद्धा दर मिळेनासा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपले टोमॅटोचे फड अर्ध्यावरच सोडून दिले आहेत. पाऊसही नाही आणि दरही नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ना घरका ना घाटका, अशी झाली आहे. टोमॅटोच्या पिकासाठी लागवडीपासून ते फळधारणेपर्यंत हजारो रुपये खर्च करावे लागतात. एवढं करूनही खराब हवामान आणि कमी झालेले दर अशा दुहेरी संकटात बळीराजा अडकला आहे.याशिवाय तालुक्यातील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, भात, मका, वाटाणा, तूर, उडीद, मूग या पिकांचीही अवस्था दयनीय आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, शेतकरी चिंतातूर दिसत आहे. (प्रतिनिधी)भेंडी व टोमॅटोला प्रतिवर्षी चांगला दर मिळतो; पण यावर्षी पाऊस नसल्याने टोमॅटोला दर नाही. ज्यावर्षी पाऊस जास्त त्यावर्षी दर अधिक अशी साधारण स्थिती असते. शेतकऱ्यांनी फड सोडून दिल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. - किसनराव ननावरे, आडतदार दरवर्षी टोमॅटो पीक आम्ही घेतो. सरासरी १५ ते २० रुपये बाजारात दर मिळतो. त्यामुळे चांगले पैसे होतात; परंतु यावर्षी पावसाच्या अभावामुळे पाण्याची कमतरता आणि ढासळलेला दर यामुळे पूर्ण नुकसान झाले आहे. भांडवलाच्या खर्चाचे कर्ज डोईजड झाले आहे ते फेडण्यासाठी मार्गच उरला नाही.- संपतराव नेवसे, शेतकरी