शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना स्वतः करता येणार पीक पाहणीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST

मायणी : शेतकऱ्यांना हंगामात केलेल्या विविध पिकांची नोंद करण्यासाठी तसेच पडीक जमीन व शेत बांधवांची झाडे याची नोंद सातबारावर ...

मायणी : शेतकऱ्यांना हंगामात केलेल्या विविध पिकांची नोंद करण्यासाठी तसेच पडीक जमीन व शेत बांधवांची झाडे याची नोंद सातबारावर भरण्यासाठी महसूल व कृषी विभागाने स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात आले असल्याने शेतकऱ्यांना आता स्वतःच्या पिकाची पीक पाहणी नोंद घरबसल्या शेतामध्ये जाऊन करता येईल.

याबाबत अधिक माहिती की, प्रत्येक हंगामामध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये घेतलेल्या पिकांची पीक पाहणी नोंद करण्यासाठी कृषी व महसूल कार्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागत होते. शेतकऱ्यांचा वेळही वाया जात होता. कृषी विभाग व महसूल विभागाने शेतकऱ्यांची पीक पाहणी स्वतःची स्वतः भरण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार केले आहे. या शेतकऱ्याला स्वतःच्या शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाची पीक पाहणी नोंदवणे शक्य होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन किंवा घरामध्ये बसून विविध गोष्टी करणे गरजेचे आहे.

यामध्ये शेतकऱ्याने मोबाईल जाऊन ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करायचे आहे. हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून वापरता येते. मात्र, एकदा पीक-पाहणी नोंद केल्यानंतर यामध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पीक पाहणीची नोंद करताना काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. पीक पाहणी नोंद करताना गाव, तालुका, जिल्हा निवडल्यानंतर स्वतःच्या जमिनीचा किंवा जमीन मालकाचा खाते नंबर, सर्व्हे नंबर, नाव, आडनाव व मधले नाव टाकून स्वतःचे खाते शोधावे. खाते शोधल्यानंतर ते समाविष्ट केल्यानंतर चार अंकी ओटीपी मोबाईलवर उपलब्ध होतो, तो ओटीपी टाकून पुढील माहिती भरावी. यामध्ये एकूण पड जमीन, पेरणी केलेली जमीन क्षेत्र, पिकांचा फोटो तसेच कोणत्या हंगामात पीक घेतली आहे, या हंगामाची नोंद, पिकांची वर्गवारी, पिकांचा प्रकार, जलसिंचन साधन, जलसिंचन प्रकार, लागवडीची दिनांक तसेच मुख्य पिकाचा फोटो, आदी माहिती शेतामध्ये जाऊन भरता येते.

चौकट...

शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असेल..

शेतात बांधावर असलेल्या झाडांची नोंद या ॲपमध्ये करता येते तसेच पड जमीन फोटो न काढता येईल, फक्त क्षेत्र लावता येते. हे एक ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हाताळता येते. मात्र, ऑफलाइन माहिती भरणाऱ्या शेतकऱ्यांनी भरलेली माहिती नंतर इंटरनेट सेवा देणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन ऑनलाइन करावी. एकंदरीत हे ॲप शेतकऱ्यांच्या फायद्याचे असून, यामुळे शेतकरी वर्गामध्ये नक्कीच समाधानाचे वातावरण निर्माण होईल. या ॲपबाबत अधिक माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी व महसूल कार्यालयात संपर्क करणे गरजेचे आहे.