शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

सोळशीत लांडग्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

पिंपोडे बुद्रुक : सोळशी येथील शेतकरी महेश हिंदुराव शेलार (वय ५०) यांच्यावर लांडग्याने हल्ला केला. यामध्ये ते ...

पिंपोडे बुद्रुक : सोळशी येथील शेतकरी महेश हिंदुराव शेलार (वय ५०) यांच्यावर लांडग्याने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले आहेत.

वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोळशी येथील शेतकरी महेश शेलार हे गावालगत असणाऱ्या आपल्या शेतजमिनीला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. मंगळवारी रात्री अडीचच्या दरम्यान लांडग्याने अचानक त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यावेळी ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील शेतकरी शेलार यांच्या मदतीला आरडाओरडा करत घटनास्थळी आला. त्यामुळे लांडग्याने तिथून पलायन केले. दैव बलवत्तर म्हणून जखमी झालेले शेलार लांडग्याच्या हल्ल्यातून सुदैवाने बचावले. जखमी शेलार यांना दोन्ही हाताच्या कोपरांजवळ तसेच उजव्या पायाच्या गुडघ्याखाली जखम झाली असून, शेजारील शेतकरी त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक येथील रुग्णालयात रात्रीच घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यांना घरी सोडण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कोरेगावचे वनक्षेत्रपाल राजू आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार स्टेशन येथील वन परिमंडल अधिकारी सी. एच. जगदाळे व रणदुल्लाबाद येथील वनपाल अश्विनी पवार यांनी जखमीस भेट दिली व घटनास्थळाची पाहणी केली तसेच शासन नियमाप्रमाणे जखमीला मदत मिळावी, यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली.

सोळशी तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी यापुढे रात्री-अपरात्री शेताला पाणी पाजण्यासाठी जात असाल तर स्वतःच्या संरक्षणासाठी सोबतीला माणूस व हातात बॅटरी व काठी असणे गरजेचे आहे, असे आवाहन वाठार स्टेशन वन विभागाचे परिमंडल अधिकारी जगदाळे यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी वन परिमंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते, तसेच हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला औषधोपचारासाठी शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा तमाम शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

फोटो

०६महेश शेलार जखमी शेतकरी