आठवणींनी पाणावले सर्वांचेच डोळे

By Admin | Updated: November 28, 2015 00:10 IST2015-11-27T20:43:43+5:302015-11-28T00:10:46+5:30

पवारवाडी शाळेचा उपक्रम : माजी विद्यार्थी मेळाव्याने जुन्या आठवणींना उजाळा

Eyes of Everyone | आठवणींनी पाणावले सर्वांचेच डोळे

आठवणींनी पाणावले सर्वांचेच डोळे

कुडाळ : कर्मवीर भाऊराव पाटील व माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमित शनिवारी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. ओढा-टेकडी फोडून श्रमदान करणाऱ्या तसेच स्वत:ची जमीन शाळेसाठी दान करणाऱ्यांच्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावले. निमित्त होते माजी विद्यार्थी स्रेहमेळाव्याचे.रयतच्या पवारवाडी (ता. जावली) येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत माजी विद्यार्थी मेळावा दिमाखात झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शहाजी कदम होते. आसू अन् हसूचे दर्शन घडवणाऱ्या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक व शिक्षकांना निमंत्रित केले होते. यामध्ये व्ही. वाय. पाटील, पिसाळ सर, कुरळे सर, जे. बी. सावंत, बी. के. पाटील, एम. डी. जाधव, सुरेश पवार, वसंतराव दुदुस्कर, व्ही. बी. गायकवाड, दुदुस्कर सर, एम. के. सोनावणे, व्ही. एम. जाधव, पी. के. भोसले, डी. एल. तुपे, ढोणे , खरे, कारंडे, मोरे, पी. एम. पाटील, विजयराव माने, पी. व्ही. दुदुस्कर, कदम, व्ही. एस. जगताप यांची उपस्थिती होती.
विष्णू करंजकर यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने स्रेहमेळाव्याची मजा उत्तरोत्तर वाढतच राहिली.
जहांगिर पठाण यांनी प्रास्तविकात माजी विद्यार्थी स्रेहमेळाव्या पाठामागीचा उद्देश स्पष्ट केला.
दीपक पवार यांनी आभार मानून हा मेळावा दरवर्षी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी होणार असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)


पळून गेलेले शिक्षक रमले १८ वर्षे
कोल्हापूरहून बदली झालेले ढोणे सर पवारवाडीला आले. परंतु त्यांना शाळाच सापडली नसल्याने ते पुन्हा रयत संस्थेत गेले व त्यांनी विनवणी केली की मला दुसरी शाळा द्या. पण संस्थेने नकार देत पुन्हा पवारवाडीला पाठवले. तेंव्हा त्यांचे स्वागतही पळून गेलेले शिक्षक म्हणूनच झाले. परंतु ग्रामस्थांकडून मिळालेले प्रेम, आपुलकी यामुळे ते पवारवाडी शाळेत १८ वर्षे रमले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण त्यांना ‘पप्पा’ या नावानेच आजही हाक मारतात. कित्येकदा या गावची आठवून काढून ढोणे सरांचे डोळे पानावले आहेत. आपल्या घरापासून लांब राहुनही कायम कुटूंबात असण्याचा मानसिक आधार या गावाने दिला आहे.

Web Title: Eyes of Everyone