शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस वर्षे कामे करूनही लोकसभेत आम्ही काठावर पास

By admin | Updated: July 13, 2014 22:52 IST

वडूज : लोकसभा निकालानंतर प्रथमच रामराजेंची खदखद प्रकट

वडूज : ‘लोकसभा निवडणूक ही कार्यकर्ते व आपणाला अंर्तमुख करणारी ठरली आहे. येथील पाणीयोजना कोणत्या नदीवर आहेत, हे माहीत नसणाऱ्यांनी येथे निवडणूक लढविली. पंचवीस वर्षे राजकारणापलीकडे जाऊन या भागात कामे केली तरी लोकसभेत आम्ही काठावर पास झालो आहोत,’ अशी खंत राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक -निंबाळकर यांनी व्यक्त केली. येथील बचत सभागृहात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, माजी आमदार सदाशिव पोळ, अनिल देसाई, सभापती सोनाली खैरमोडे, सभापती श्रीराम पाटील, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, उपसभापती पिंटू जगताप, नंदकुमार मोरे, काकासाहेब मोरे, हिंदुराव गोडसे, विलासराव माने, कविता म्हेत्रे, सतीश फडतरे, मानसिंग माळवे, सुनंदा राऊत, डॉ. प्रशांत गोडसे, शशिकला देशमुख, भाग्यश्री भाग्यवंत, प्रा. अर्जुन खाडे, जितेंद्र पवार, धनाजी पवाशे उपस्थित होते. नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘जातीवादाचे राजकारण करून पश्चिम महाराष्ट्रातील जातीयतेढ निर्माण करू नका, आमच्यासोबत सर्व जातीधर्मांतील लोक आहेत. सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना भडकविले जात आहे. आघाडीतील सहकारी पक्षच आम्हाला शत्रू मानत असेल तर येथून पुढील काळात सहकारी पक्षाची कुबडी घेऊन निवडणुका होणार नाहीत. आमच्या पक्षातील मंत्र्यांमुळेच राज्याचा विकास झाला. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सावधगिरी बाळगावी.’ सत्काराला प्रतिउत्तर देताना खासदार विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, ‘सत्कार हे निमित्त असून, मला या भागातील जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधावयाचा होता. गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा, विदर्भच्या अनुशेषाचा मुद्दा गाजत आहे. त्या कारणाने पश्चिम महाराष्ट्रात अनेक प्रश्न रखडले आहेत.’ उपसभापती नाना पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. हणमंतराव शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास आ. प्रभाकर घार्गे, सुहास राजमाने, सोन्या जाधव, तानाजी पवार, अप्पासाहेब गोडसे, बाबासाहेब घार्गे, एस. पी. देशमुख, रामभाऊ खाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)