शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याची नियुक्ती लवकरच

By admin | Updated: June 10, 2016 00:21 IST

पाणीपुरवठा मंत्र्यांचे आश्वासन : उदयनराजे भोसले यांनी घेतली मुंबईत भेट

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात पूर्णवेळ कार्यकारी अभियंता मिळावा, या मागणीसाठी नगराध्यक्ष विजय बडेकर, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, निशांत पाटील, सुवर्णा पाटील यांनी आंदोलन छेडल्यानंतर जोरदार हालचाली झाल्या. खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी थेट पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे सातारकरांच्या लोकभावना मांडल्या. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन लोणीकर यांनी दिले. जीवन प्राधिकरणाला गेल्या पाच वर्षापासून पूर्णवेळ कार्यकारी अभियंता उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही, कधी उपअभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याचा भार, तर काही वेळा अतिरिक्त कार्यभार देण्यात पांच वर्षे निघून गेली, त्यामुळे जीवन प्राधिकरणच्या कारभारात मरगळ येऊन, त्याचा फटका शाहुनगरवासियांना बसत आहे. जीवन प्राधिकरणच्या ढिसाळ कारभारावर नागरीकांमध्ये असंतोष पसरला आहे. परिणामी टाळेठोक आंदोलनासारखे प्रकार वारंवार होत आहेत. याबाबत शासनाने तातडीने सातारच्या जीवन प्राधिकरण कार्यालयास पूर्णवेळ कार्यकारी अभियंता उपलब्ध करुन द्यावा अशी प्रमुख मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना समक्ष मंत्रालयात भेटून मांडली. याबाबत तातडीने कार्यवाही करु, असे आश्वासन बबनराव लोणीकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना यावेळी दिले. खासदार उदयनराजे भोसले यांनी बबनराव लोणीकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सातारा शहर व उपनगरास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे पाणीपुरवठा होत असून, सातारची वाढीव पाणीपुरवठा योजना, शाहुपूरीची नवीन २४ बाय ७ योजना, उपनगरातील दैनंदिन पाणीपुरवठा इत्यादी कामे गेल्या पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून, कार्यकारी अभियंता या पदावर पूर्णवेळ अधिकारी नसताना हाताळली जात आहेत.कार्यकारी अभियंता हे पद गेल्या पाच वर्षांपासून पूर्णवेळ कधीच कार्यरत नव्हते, त्यामुळे पाणीपुरवठ्यासारख्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत दुर्लक्ष होवून, सुरळीत व समान दाबाने पाणीपुरवठा करण्यात सातत्याने समस्या निर्माण होत आहेत. यावर ‘आपण स्वत: लक्ष देवून, पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नेमण्याची कार्यवाही तातडीने करु’, असे आश्वासन यावेळी मंत्र्यांंनी दिले.याप्रसंगी नगरसेवक अ‍ॅड. डी. जी.बनकर, अशोकराव सावंत, इत्यादी उपस्थित होते. (प्रतिनिधी) ‘लोकमत’ च्या वृत्ताची खासदारांकडून दखल --महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नसल्याने शहरातील विविध पाणी योजनांची कामे रखडली आहेत. या प्रश्नावर माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, नगराध्यक्ष विजय बडेकर आदींनी आंदोलन केल्यानंतर ‘लोकमत’ ने खासदार व आमदारांनी याप्रकरणी लक्ष घालण्याविषयीचे वृत्तात म्हटले होते. याची दखल घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत आवाज उठविला आहे.