ग्राहक संघाच्या कट्ट्यावरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 20:34 IST2019-06-30T20:33:23+5:302019-06-30T20:34:12+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिल कणसे हे खरेदीसाठी जिल्हा ग्राहक संघात गेले होते.

Elimination of customer's death by falling off of the customer's team | ग्राहक संघाच्या कट्ट्यावरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू

ग्राहक संघाच्या कट्ट्यावरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू

सातारा : येथील जिल्हा ग्राहक संघाच्या कट्ट्यावरून तोल जाऊन पडून अनिल हणमंत कणसे (वय ५३, रा. अंगापूर वंदन, ता. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिल कणसे हे खरेदीसाठी जिल्हा ग्राहक संघात गेले होते. यावेळी ते ग्राहक संघाच्या इमारतीमधील कट्ट्यावर बसले होते. त्यावेळी त्यांचा अचानक तोल गेला. त्यामुळे ते कट्ट्यावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना साताºयातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कणसे ज्या कट्ट्यावर बसले होते. तो कट्टा साधारण पाच ते सहा फूट उंचीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते सैन्य दलातून निवृत्त झाले होते. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Elimination of customer's death by falling off of the customer's team