निवडणूक एका वर्षावर, राष्ट्रवादीच्या सदस्यांची कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST2021-03-21T04:39:24+5:302021-03-21T04:39:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा परिषदेची निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपलेली आहे. पदाधिकाऱ्यांबाबत सदस्यांकडून नाराजी व्यक्त केली गेली ...

Elections One year later, do the work of NCP members | निवडणूक एका वर्षावर, राष्ट्रवादीच्या सदस्यांची कामे करा

निवडणूक एका वर्षावर, राष्ट्रवादीच्या सदस्यांची कामे करा

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा परिषदेची निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपलेली आहे. पदाधिकाऱ्यांबाबत सदस्यांकडून नाराजी व्यक्त केली गेली आहे. सर्वांनीच कामात सुधारणा करावी, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली.

येथील जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या शासकीय निवासस्थानी जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी यांची बैठक शनिवारी पार पडली. रामराजे यांनी सर्व सदस्यांना कानपिचक्या दिल्या. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला बालकल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीतील झापाझापीबाबत सदस्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी लोकांची कामे करावीत, त्यांच्या स्वीय सहायकांनी कार्यपद्धतीत बदल करावा तसेच जी कामे येतील त्याबाबत विचारपूर्वक निर्णय घेऊन कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सभागृहात पक्षाला अडचणीत आणणाऱ्या सदस्यांची कानउघाडणी

पक्षाच्या बैठकीत एक बोलायचे आणि सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीलाच अडचणीत आणून पक्षाचे खच्चीकरण होईल, असे काम करणाऱ्या सदस्यांनाही यावेळी चांगलेच झापण्यात आले. पुन्हा असे झाले तर त्याची दखल वरिष्ठ पातळीवरूनच घेतली जाईल, असेही यावेळी सुनावण्यात आले.

Web Title: Elections One year later, do the work of NCP members