शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: सातारा जिल्ह्यातील दोन नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित, २० डिसेंबरला मतदान होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 19:33 IST

आर्थिक गणिते कोलमडली !, अर्ज माघारीपर्यंतची प्रक्रिया जैसे थे

सातारा : सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २) मतदान होणार असले तरी, निवडणूक आयोगाने तांत्रिक कारणास्तव फलटण आणि महाबळेश्वर या दोन नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे. या दोन्ही पालिकांसाठी शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशानुसार या दोन्ही पालिकांच्या अर्ज माघारीपर्यंतच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार आहे. केवळ नामनिर्देशनपत्राबाबत हरकती दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांवर सुनावणी होऊन त्यांचे अर्ज वैध, अवैध ठरवून चिन्ह वाटप व पुढील मतदान प्रक्रिया राबविली जाईल. त्यामुळे नव्या कोणत्याही उमेदवारांना निवडणुकीची संधी मिळणार नाही.

आर्थिक गणिते कोलमडली !दोन पालिकांची निवडणुकीची लांबलेली प्रक्रिया उमेदवारांसाठी दुहेरी आव्हान घेऊन आली आहे. एकीकडे प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला असला तरी दुसरीकडे निवडणूक आयोगाने नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारांना खर्चाची जी मर्यादा घालून दिली आहे, ती पाळणे आता अधिक कठीण होणार आहे. अनेक उमेदवारांनी दि. २ डिसेंबरच्या मतदानाच्या अनुषंगाने सर्व प्रचार यंत्रणा सक्रिय केली होती; आता वाढीव प्रचारासाठी अतिरिक्त खर्च करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, ज्यामुळे त्यांची आर्थिक गणिते कोलमडणार आहेत.

प्रचार आणि वेळेचे व्यवस्थापन..निवडणूक लांबणीवर गेल्याने उमेदवारांना त्यांच्या मतदारांशी संपर्क साधण्यासाठी आणि प्रचार धोरणे अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. मात्र, हा वाढीव वेळ प्रभावीपणे कसा वापरायचा आणि आयोगाच्या खर्चमर्यादेत राहून प्रचार कसा करायचा, हे मोठे आव्हान उमेदवारांसमोर उभे आहे.अनेक नागरिकांमध्ये संभ्रम..राज्य निवडणूक आयोगाने महाबळेश्वर व फलटण पालिकेचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्वत्र संभ्रम निर्माण झाला. निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविली जाणार असून, नव्या उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार असल्याच्या चर्चेने पेव फुटले. मात्र, असे काहीही होणार नाही. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यापर्यंतचा कार्यक्रम ‘जैसे थे’ राहणार आहे. ज्या उमेदवारांची चिन्हे मिळाली आहेत, तीदेखील कायम राहणार आहेत. केवळ उमेदवारी अर्जाबाबत ज्यांनी अपील केले आहे, त्यांच्या अपिलांवर निर्णय होऊन पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.

निवडणूक पुढे का ढकलण्यात आली..

  • फलटण आणि महाबळेश्वर या दोन्ही पालिकांमध्ये दाखल करण्यात आलेल्या अपिलांची सुनावणी आणि त्यांचा अंतिम निर्णय देण्याचे काम निवडणुकीच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. अपिलांवरील निर्णय दिल्याशिवाय निवडणुकीची पुढील प्रक्रिया पुढे नेता येत नाही, कारण अपिलांवर निर्णय होईपर्यंत निवडणूक रिंगणातील अंतिम आणि वैध उमेदवारांची यादी निश्चित करता येत नाही.
  • जर एखाद्या उमेदवाराचे अपील मंजूर झाले, तर त्याला निवडणूक लढवण्याचा हक्क मिळतो आणि जर ते फेटाळले, तर त्याची उमेदवारी रद्द होते.
  • अंतिम उमेदवारांची यादी निश्चित झाल्याशिवाय त्यांना निवडणूक चिन्ह वाटप करता येत नाही आणि मतदारपत्रिकेवर त्यांची नावे समाविष्ट करता येत नाहीत. ही प्रक्रिया मतदानापूर्वी पूर्ण होणे बंधनकारक आहे. वेळेत सुनावणी न घेता निवडणूक घेणे हे उमेदवारांच्या नैसर्गिक न्यायाच्या आणि कायदेशीर निवडणूक लढवण्याच्या हक्काचे उल्लंघन ठरले असते.
  • या तांत्रिक अडचणीमुळे, निवडणूक आयोगाने दि. २ डिसेंबर रोजी होणारे मतदान तात्पुरते स्थगित केले आणि सर्वप्रथम अपिलांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोन्ही पालिकांसाठी दि. २० डिसेंबरला मतदान, तर दि. २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Local Body Polls Postponed in Phaltan, Mahabaleshwar; Voting on Dec 20

Web Summary : Satara's Phaltan and Mahabaleshwar municipal elections are postponed due to technical reasons. Voting rescheduled for December 20th. Candidate expenses are affected. This created confusion among citizens. The decision was made due to pending appeal hearings.