शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पाटण नगरपंचायतीत सभापती निवडी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:53 IST

पाटण येथील नगरपंचायत कार्यालयात सोमवारी पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या ...

पाटण येथील नगरपंचायत कार्यालयात सोमवारी पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या उपस्थितीत या निवडी झाल्या. प्रत्येक सभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सर्वच निवडी बिनविरोध पार पडल्या. यामध्ये पाणीपुरवठा सभापतिपदी उपनगराध्यक्ष विजय ऊर्फ बापू टोळे, महिला व बालकल्याण सभापती रश्मी राजेंद्र राऊत, नियोजन विकास व शिक्षण सभापती योगिता रामचंद्र कुंभार, बांधकाम सभापती किरण पवार व स्थायी समिती सभापती पदावर नगराध्यक्ष अजय कवडे यांची निवड झाली. या निवडीनंतर श्रीरंग तांबे व अभिषेक परदेशी यांनी नवनिर्वाचित निवडी जाहीर करीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

नवनिर्वाचित सभापतींचा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, पाटण अर्बन बँकेचे अध्यक्ष दिनकरराव घाडगे, शंकरराव जाधव, अ‍ॅड. अविनाश जानुगडे, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेश पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण उपस्थित होते.

फोटो : २३केआरडी०४

कॅप्शन : पाटण नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती निवडी बिनविरोध पार पडल्यानंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला.