शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गामूर्ती कामात कलाकाराची कसोटी

By admin | Updated: September 16, 2014 23:57 IST

वर्गणीचा परिणाम : गणेशमूर्तींपेक्षा किंमती कमीच

सातारा : भक्तांच्या लाडक्या बाप्पांच्या निरोपानंतर आता कुंभारवाड्यात लगबग सुरू झाली आहे ती दुर्गोत्सवाची! दुर्गा देवीची मूर्ती घडविणे क्लिष्ट असले तरीही तिच्या किंमती कमी आहेत. याला कारण मंडळांना मिळणारी वर्गणी असल्याची माहिती पुढे आली आहे. लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर भक्तांना वेध लागतात ते दुर्गादेवीचे. विविध रूपातील आणि आकारातील दुर्गा मूर्ती तयार करण्याचे काम कुंभारवाड्यात सुरू आहे. गणपतीची ८- १० फुटी मूर्तीची किंमत यंदा सुमारे २८ हजार रूपये होती. मात्र, दुर्गादेवीची ८- १० फुटी मूर्तीची किंमत अवघे १३ हजार रूपये म्हणजेच जवळपास निम्मी!दुर्गामूर्ती साकारताना खुप बारिक कलाकुसरही करावी लागते. देवीचे डोळे, केसांची ठेवण, साडी, अलंकार, देवीच्या हातातील विविध शस्त्रे, सिंह, राक्षस आदी गोष्टींवर कलाकारांना बरीच मेहनत करावी लागते. ही मूर्ती साकारण्यासाठी कलाकारांना वेळही तुलनेने खुपच कमी मिळतो. म्हणून जादा कारागीर लावून हे काम पूर्ण केले जाते. या मूर्ती घडविताना त्यांना होणारा त्रास आणि येणारा खर्च याचा ताळमेळ घातल्यास असे लक्षात येते की कारागीर गणपती मूर्तीला अधिक पैसे घेतात. याविषयी अधिक माहिती घेतली असता, नाव न छापण्याच्या अटीवर एका मूर्तीकाराने सांगितले की, ‘गणेशोत्सव मंडळांना देणगी आणि वर्गणी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. त्यामुळे मंडळे महागड्या मूर्ती घेतात. गणपतीनंतर पंधरा दिवसांतच येणाऱ्या दुर्गात्सवाला देणगी देण्यासाठी लोक इच्छुक नसतात. त्यामुळे दुर्गा मंडळांना वर्गणीचे पाठबळ मोठे नसते.त्यामुळे त्यांच्या बजेटनुसारच त्यांच्याकडून मूर्तीचे पैसे घेतले जातात.’ सध्या दुर्गात्सवाची जागोजागी जोरदार तयारी सुरु आहे. (प्रतिनिधी)दुर्गेने बदलले वाहन!येथील कामाठीपुरा पेठेतील एका मंडळाने वेगळी मूर्ती करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार कुंभारवाड्यात ही मूर्ती तयार होत आहे. दुर्गा देवीचे वाहन सिंह असते, या मंडळाने मात्र दुर्गेचे वाहन बदलले आहे. यंदा दुर्गा नंदी बैलावरून येणार आहे. दरवर्षी दुर्गेचे एक - एक रूप साकारण्याचा संकल्प करणाऱ्या या मंडळाची ही मूर्तीही भक्तांच्या आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे.या मूर्ती घडविताना त्यांना होणारा त्रास आणि येणारा खर्च याचा ताळमेळ घातल्यास असे लक्षात येते की कारागीर गणपती मूर्तीला अधिक पैसे घेतात. गणेशोत्सव मंडळांना देणगी आणि वर्गणी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. त्यामुळे मंडळे महागड्या मूर्ती घेतात, असेही दिसून आले.