गोपनीय दौरा; खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा दरेगावी उतरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 18:22 IST2024-10-18T18:12:03+5:302024-10-18T18:22:53+5:30
साताऱ्यासह दरे गावात जोरदार पाऊस, मुख्यमंत्री वाहनाने मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता

गोपनीय दौरा; खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा दरेगावी उतरले
सातारा: मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आपल्या गावी एक दिवसीय दौऱ्यावर आले होते. दरम्यान ते हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होत असताना खराब हवामानामुळे व प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा दरेगावी उतरले आहे. मुख्यमंत्री आपल्या मोटारीने मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा अत्यंत गोपनीय मानला जात आहे. मुख्यमंत्री काल रात्री उशिरा अत्यंत धावपळीत अचानक दरे दौऱ्यावर आले होते. आता पुन्हा ते त्यांचा नियोजित दौरा आटोपून मुंबईकडे प्रयाण करत असताना त्यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे पुढे जाऊ शकत नसल्याने ते पुन्हा दरेत उतरले.