सातारा : ट्रकमध्ये आढळला चालकाचा मृत्यू, पोलीस करताहेत तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 11:41 IST2017-12-02T11:41:54+5:302017-12-02T11:41:57+5:30
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ इंदोली फाटा येथे शनिवारी (2 डिसेंबर) सकाळी ट्रकमध्ये चालकाचा मृतदेह आढळून आला. बाळासाहेब रामचंद्र पवार (वय 58 वर्ष) मृत ट्रक चालकाचे नाव आहे.

सातारा : ट्रकमध्ये आढळला चालकाचा मृत्यू, पोलीस करताहेत तपास
उंब्रज (सातारा) - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ इंदोली फाटा येथे शनिवारी (2 डिसेंबर) सकाळी ट्रकमध्ये चालकाचा मृतदेह आढळून आला. बाळासाहेब रामचंद्र पवार (वय 58 वर्ष) मृत ट्रक चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोली फाटा येथील सोहम पेट्रोल पंपाच्या समोर एमएच १० ए २३८९ क्रमांकाचा ट्रक उभा होता. पंपावरील कर्मचारी किशोर निकम हे ट्रक बऱ्याच वेळ उभा असलेला पाहून ट्रककडे गेले. तेव्हा ट्रकच्या स्टेअररिंगवर त्यांना ट्रक चालक झोपलेला दिसला.
त्यांनी ट्रकचालक पवार यांना उठवण्याचा प्रयत्न केला; पण ते उठले नाहीत. त्यांनी उंब्रज पोलिसांना फोन केला. उंब्रज पोलीस तातडीने घटनास्थळी गेले. त्यावेळी पवार हे मृत झाल्याचे त्याच्या लक्षात आले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी मृतदेह कऱ्हाड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेला आहे.