चालकाचा ताबा सुटल्याने कारची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST2021-01-13T05:42:42+5:302021-01-13T05:42:42+5:30

ट्रॅक्टर (क्र. एमएच २३ टी ४६१४) हा दोन ट्रॉलीमधून ऊस भरून कऱ्हाडकडून जयवंत शुगर कारखान्याकडे जात होता. पुणे-बंगळूर ...

The driver lost control and the car hit the tractor trolley | चालकाचा ताबा सुटल्याने कारची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक

चालकाचा ताबा सुटल्याने कारची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक

ट्रॅक्टर (क्र. एमएच २३ टी ४६१४) हा दोन ट्रॉलीमधून ऊस भरून कऱ्हाडकडून जयवंत शुगर कारखान्याकडे जात होता. पुणे-बंगळूर महामार्गावर वारूंजी फाटा येथील उड्डाणपुलावर आला असता कोल्हापूरवरून साताऱ्याकडे निघालेल्या कारच्या (क्र. एमएच ०२ एक्यू ०११८) चालकाचा ताबा सुटल्याने कारची ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील दोघे जखमी झाले, तर दोघे सुदैवाने बचावले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग विभागाचे कर्मचारी अमित पवार, रमेश खूने, सिकंदर उघाडे तातडीने अपघातस्थळी दखल झाले. अपघाताची खबर कऱ्हाड शहर पोलिसांसह महामार्ग पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेन बोलावून वाहने बाजूला घेतली. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती.

फोटो : १२केआरडी०१

कॅप्शन : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वारुंजी फाटा येथे कारची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक बसली. या अपघातात कारचे नुकसान झाले.

Web Title: The driver lost control and the car hit the tractor trolley