Satara: चालकाचा ताबा सुटून जानुगडेवाडीनजीक एसटी बसची झाडाला धडक, विद्यार्थ्यांसह ३० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:46 IST2025-06-19T11:45:34+5:302025-06-19T11:46:03+5:30

चौघांची प्रकृती गंभीर: जानुगडेवाडीनजीक घडली घटना

Driver loses control ST bus hits tree near Janugadewadi Satara, 30 people including students injured | Satara: चालकाचा ताबा सुटून जानुगडेवाडीनजीक एसटी बसची झाडाला धडक, विद्यार्थ्यांसह ३० जण जखमी

Satara: चालकाचा ताबा सुटून जानुगडेवाडीनजीक एसटी बसची झाडाला धडक, विद्यार्थ्यांसह ३० जण जखमी

रवींद्र माने

ढेबेवाडी: खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला वाचविताना एसटी बस चालकाचा ताबा सुटून बस झाडावर धडकल्याने ३० जण जखमी झाले. जानुगडेवाडीनजीक एका धोकादायक वळणावर आज, गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. चार जण गंभीर असल्याने त्यांना कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर जखमींवर ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

याबाबत माहिती अशी, पाटण डेपोची एसटी बस सळवे येथून पाटणकडे निघाली होती. दरम्यान, जानुगडेवाडीनजीक कराड कडून येणारी खासगी प्रवासी बस अचानकपणे समोरुन भरधाव वेगाने आल्याने बस चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याकडेच्या झाडावर धडकली. यामध्ये बस चालकासह तीसजण जखमी झाले. किरकोळ जखमी विद्यार्थीअपघात झाल्यानंतर पळून गेले.

जखमींमध्ये चालक आरिफ निजाम मुल्ला (वय-५७ रा. कोळे), वाहक आर. एम. काळे (५७ रा.मालदन), सरिता धनाजी जाधव (वय ५३) सीताबाई नायकु मगरे (६१) रंजना सुरेश मगरे (५८) बाळाबाई शिवाजी मगरे (५८) शोभा भगवान मगरे (५०) निर्मला अशोक मगरे (४२) शोभा परशुराम जाधव (६५) शारदा सोनवणे (५०) छाया तानाजी जाधव (४४) धनाजी अंतू जाधव (५८, सर्व रा. सणबूर ता.पाटण), तुकाराम ज्ञानू भाईगडे (५९), तुकाराम गणपती यादव (५०) संपदा हनुमंत पुजारी (५०), शारदा सुरेश परीट (५०), यश जालिंदर बोरगे (१७) रोहिणी राजाराम गुरव (सर्व रा. सळवे),  जिजाबाई जयसिंग चोरगे (७०), सुमन वसंत चोरगे (६०, सर्व रा. शिंदेवाडी),
 
कमल शिवाजी जगदाळे (६०), बाळू नाना साळुंखे (५६), पल्लवी सुमित पवार (२६), सीताबाई वसंत लोहार (५०), श्रावणी सतीश पाटील (१५), आराध्या सतीश पाटील (१३), प्रगती रवींद्र पाटील (१५), समर्थ विक्रम जगदाळे (१९, सर्व रा. बनपुरी) मालन बाळासो साळुंखे (६४), जया बाळासाहेब साळुंखे (६८ सर्व रा. महिंद) यांचा समावेश आहे. 

यापैकी निर्मला अशोक मगरे, पल्लवी अमित पवार, संभाजी सिताराम कुंभार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कराडला हलवण्यात आले आहे. अपघाताची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. अपघातानंतर जखमींच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते अजित मोहिते, मनोज मोहिते, नानासाहेब साबळे, सचिन जाधव, आदिंनी सहकार्य केले. 

Web Title: Driver loses control ST bus hits tree near Janugadewadi Satara, 30 people including students injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.