बारा तास काम करूनही चालक-वाहक फीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:30 PM2018-10-07T22:30:53+5:302018-10-07T22:31:07+5:30

Driver-carrier feet even after working twelve hours | बारा तास काम करूनही चालक-वाहक फीट

बारा तास काम करूनही चालक-वाहक फीट

Next

सातारा : दहा-बारा तास एसटी चालवणं... रात्रीचं जागरण.. मिळेल तेथे मिळेल ते खाणं... एसटीच्या चालक-वाहकांना अनेक व्याधी जडणे, चिडचिडणेपणा वाढण्याच्या घटना घडतात. असे असताना राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील चालक-वाहक फीट अन् फाईन असल्याचे समोर आले.
साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने शुक्रवारी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातील शंभर कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये त्यांची मोफत उच्च रक्तदाब व मधूमेह तपासणी करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळातील चालक-वाहकांना अनेकदा बारा तासांहून अधिक तास काम करावे लागते. लांब पल्ल्याची गाडी घेऊन गेले तर ते कुटुंबीयांपासून दोन-तीन दिवस लांब असतात. त्यामुळे त्यांना वाटेत मिळेल तेथे खावे लागते. अनेक ठिकाणी चांगल्या हॉटेलची सुविधा नसल्याने वडापाव खाऊन रात्र काढावी लागते. प्रवासात जागरण करत असल्याने अनेक व्याधी जडत असतात, असा अनेकांचा अनुभव असतो. त्यामुळे चिडचिडपणे वाढणे, अपघाताच्या घटना घडत असल्याचा अंदाज व्यक्त केला
जातो.
सातारा आगारातील कर्मचाºयांच्या बाबतीत मात्र चांगला अनुभव येत आहे. सुमारे शंभर कर्मचाºयांची शुक्रवारी तपासणी करण्यात आली. यामध्ये आठजणांना उच्च रक्तदाब, आठ जणांना मधुमेह तर दोन जणांना दोन्ही आजार असल्याचे दिसून आले. बदलत्या जीवनशैलीत रक्तदाब, मधुमेह असलेले रुग्ण घरोघरी दिसतात. असे असताना शंभर कर्मचाºयांपैकी सोळा रुग्ण हे प्रमाण नक्कीच चिंताजनक नाही. हे कर्मचाºयांच्यादृष्टीने आनंदाची बाब आहे. तरीही चालक-वाहकांनी सावध असणे गरजेचे आहे.
यावेळी डॉ. सचिन काळे, समुपदेशक मोनाली भोसले, परिचारिका मानसी सपकाळ, सारिका माने यांनी आरोग्य तपासणी केली.
कर्करोगाबाबत जनजागृती
एसटीमध्ये अनेक महिला कर्मचारीही कार्यरत आहेत. त्यांना स्तनाचा, गर्भशयाच्या कर्करोगाबाबत आरोग्य परिचारिकांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Driver-carrier feet even after working twelve hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.