शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
4
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
5
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
6
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
7
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
8
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
9
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
10
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
11
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
12
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
13
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
14
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
15
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
17
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
18
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
20
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
Daily Top 2Weekly Top 5

‘डबलडेकर’ नाल्याने वाढविली डोकेदुखी!

By admin | Updated: January 13, 2015 00:08 IST

वाहनचालकांची पंचाईत : कुंभारवाड्यासमोरील नाल्यात अडकतायत वाहने; पादचारीही होतायत जखमी

प्रदीप यादव - सातारा  -पावसाळ्यात पाणी साचून रस्ता खराब होऊ नये यासाठी नगरपालिकेने केसरकर पेठेतील कुंभारवाड्यासमोर लाखो रुपये खर्चून पूर्वीच्या भुयारी गटारावर दुसरा नाला बांधला आहे. मात्र, या ‘डबलडेकर’ नाल्यामुळे फायदा होण्याऐवजी अडचणीत भरच पडत असून दुचाकी, चारचाकी वाहने या नाल्यात अडकून पडण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी सायंकाळी पाचच्या सुमारास एका कारचे पार्किंग करत असताना चालकाला अंदाज न आल्याने कारच्या डाव्या बाजूची दोन्ही चाके गटारात जाऊन गाडी अडकली. प्रयत्न करूनही कार नाल्यातून बाहेर काढण्यात अपयश आल्यानंतर शेवटी पोलीस वाहतूक शाखेच्या क्रेनला पाचारण करण्यात आले. त्यानंतर क्रेनच्या साह्याने कार अलगद उचलून बाहेर काढण्यात आली.
ही एकच घटना नाही तर यापूर्वीही या ‘डबलडेकर’ नाल्याने वाहनचालकांची मोठी पंचाईत केली आहे. असे प्रकार यापूर्वीही घडले असून, नाल्यात अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांना क्रेन घेऊन यावे लागले आहे.
शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नगरपालिकेने रस्त्यांचे काम हाती घेतले. केसरकर पेठेतील कुंभारवाड्यासमोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे या ठिकाणी पाण्याची डबकी साचून राहत होती. वाहनचालकांना अक्षरश: कसरतच करावी लागत होती. सातारकर शहरातील खराब रस्त्याला कंटाळून गेले होते. अशातच नगरपालिकेने रस्त्यांची कामे हाती घेतली आणि वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. कुंभारवाड्यासमोरील रस्त्याचे काम झाले. त्यानंतर रस्त्यावर पाणी साचून रस्ता खराब होऊ नये यासाठी पालिकेने शक्कल लढवून रस्त्याकडेला असणाऱ्या भुयारी गटाराच्या वर आणखी एक छोटा नाला बांधला. मात्र, ज्या हेतूसाठी हा नाला बांधला त्याचा काडीमात्र उपयोग होत नसून उलट डोकेदुखी वाढली आहे. या नाल्यावर जाळी बसविण्याची मागणी होत आहे.


नाला देतोय विद्यार्थ्यांना जखमा
या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थ्यांची ये-जा असते. रस्त्यापासून पादचारी मार्गाची उंची जास्त असल्याने उडी मारताना पाय घसरून नाल्यात पडून अनेकदा विद्यार्थी जखमी झाले आहेत. दुचाकीस्वारांनाही या ‘डबलडेकर’ नाल्याने आपला हिसका दाखविला आहे.
कचराकुंडीसारखा वापर
ज्या हेतूसाठी नाला बांधला तो निष्फळ ठरला आहे. कारण रस्त्यावरील पाणी नाल्यात जाण्यासाठी कसलीच व्यवस्था केलेली नाही. पादचारी जाता-येता या नाल्याचा कचराकुंडीसारखा वापर करत असून, सध्या हा नाला माती, कचऱ्याने भरू लागला आहे.

या रस्त्यावर आता पार्किंग होत असल्यामुळे वाहने लावताना नाल्यात अडकत आहेत. पादचाऱ्यांना दुखापत होत आहे. भुयारी गटार असताना त्यावर दुसरा नाला बांधण्याची गरज नव्हती. होल मारून रस्त्यावरील पाणी भुयारी गटारात सोडता आले असते. पालिकेने दुसरा नाला बांधून वायफळ खर्च केला आहे.
- शरद कुंभार