शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तासगावातील दादागिरीची सीआयडी चौकशी करा

By admin | Updated: August 23, 2015 23:38 IST

संजय पाटील : दहा वर्षांतील काळा इतिहास समोर येईल; पूर्वी सत्तेत असणाऱ्यांची टगेगिरी

सांगली : राष्ट्रवादीने माझ्यावर दादागिरीची टीका करण्यापेक्षा गेल्या दहा वर्षातील तासगाव तालुक्यातील दादागिरीची सीआयडी चौकशी करावी, त्यातून काही लोकांचा काळा इतिहास समोर येईल, असा प्रतिटोला खासदार संजय पाटील यांनी रविवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लगावला. ते म्हणाले की, ज्यांनी यापूर्वी अमर्याद सत्ता उपभोगली, त्यांनीच निवडणुकांमध्ये टगेगिरी केली. गेल्या दहा वर्षांची चौकशी केली, तर कुणी गुंडांना अभय दिले, कुणी बलात्कारासारख्या गुन्ह्यांवर पांघरुण घातले, हा सर्व काळा इतिहास लोकांसमोर येईल. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुसऱ्यावर आरोप करण्यापूर्वी इतिहास तपासून घ्यावा. आपण आजवर कोणावरही पावशेर ठेवलेले नाही. निश्चितपणे कुणी मदत केली असली तरी, आम्ही कधी मदतीचे श्रेय घेतले नाही. श्रेयवादाचे राजकारण आम्हाला जमले नाही. सध्याच्या स्थितीत भावनांच्या लाटेवर स्वार होऊन राजकारण करणेही टाळले. दुसरीकडे विरोधकांनी भावनांचा गैरवापर केला. महिला आमदारांवर कोणत्याही प्रकारची टीका करणे आपणास योग्य वाटत नाही. तेवढा शिष्टाचार आम्ही पाळला आहे. मात्र ज्यांना चौकशी करायची आहे, त्यांनी दहा वर्षांच्या इतिहासाची चौकशी करावी. सरकार दुष्काळाबाबत काहीच करीत नसल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी पतंगराव कदम यांनी केला होता. त्याविषयी खासदार पाटील म्हणाले की, सत्तेत नसल्यामुळे त्यांना सगळ्याच गोष्टी चुकीच्या वाटत आहेत. वास्तविक सरकार संवेदनशील आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत सिंचन योजना तातडीने चालू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. टेंभू, ताकारी योजना सुरू करून आता शासनाने म्हैसाळ योजनेचा वीजपुरवठाही जोडला आहे. येत्या चार दिवसात विसापूर-पुणदी योजनाही कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील तलाव, पाझर तलाव, बंधारे ३० टक्क्यांपर्यंत भरून घेण्याचे नियोजन झाले आहे. दोन महिन्यांच्या वीजबिलाचा भारही शासनाने सोसला आहे. सिंचन योजना ज्या गावांमध्ये पोहोचत नाहीत, अशा गावांमध्ये तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्याचेही काम सुरू झालेले आहे. त्यामुळे शासनस्तरावर चांगल्या पद्धतीने उपाययोजना सुरू आहेत. सिंचन योजनांच्या निधीबाबतही शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. भविष्यात निधी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने आम्ही पाठपुरावा करणार आहोत. प्रादेशिक दुजाभाव शासनाने केलेला नाही. त्यामुळेच टंचाई जाहीर नसतानाही शासनाने सिंचन योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील लोकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, याची खबरदारी आता शासन घेत आहे. (प्रतिनिधी)