शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

धरणांमधून विसर्ग सुरूच; जिल्ह्यात पूरस्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:38 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १३८, नवजा १३१ आणि महाबळेश्वरला ७४ मिलिमीटर पाऊस झाला. तर पाण्याची आवक होत असल्याने प्रमुख धरणांतून विसर्ग सुरूच आहे.

ठळक मुद्देपावसाचा जोर कमी : कोयनेचे दरवाजे १० फुटांवर स्थिरनवजाला १३१ मिलिमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १३८, नवजा १३१ आणि महाबळेश्वरला ७४ मिलिमीटर पाऊस झाला. तर पाण्याची आवक होत असल्याने प्रमुख धरणांतून विसर्ग सुरूच आहे. यामुळे नद्यांची पूरस्थिती कायम आहे. तर कोयनेचे दरवाजे १० फुटांवर स्थिर असून धरणातून ऐकूण ५६ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३८ तर जूनपासून आतापर्यंत ३५९० मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला ७४ आणि आतापर्यंत ३९८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत १३१ आणि आतापर्यंत ४०८१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे.मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास कोयना धरणात २६३२७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० आणि धरणाचे ६ दरवाजे १० फुटांनी उचलून त्यातून ५३८५८ असा ५५९५८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर धरणात ९२.२७ टीएमसी ऐवढा साठा होता. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.धरणक्षेत्रात जोर ओसरला...जिल्ह्याच्या पश्चिम भागात सर्वच प्रमुख व मोठी धरणे आहेत. या धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर होता. पण, सोमवारी रात्रीपासून पाऊस कमी झाला आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धोम धरणक्षेत्रात अवघा ६ मिलिमीटर पाऊस झाला. तर कण्हेर धरण १३, उरमोडी १८, बलकवडी आणि तारळी धरणक्षेत्रात प्रत्येकी ४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर प्रमुख सहा धरणांमधून विसर्ग सुरूच आहे. सकाळी धोममधून ११६१ क्यूसेक पाणी सोडले जात होते. तर कण्हेरमधून ७०३८, उरमोडी ४३३० आणि तारळी धरणातून २६२६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. 

 

टॅग्स :floodपूरSatara areaसातारा परिसरDamधरण