शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

खासगी दवाखान्यापेक्षा बाधित रुग्णांची शासकीय कोरोना सेंटरकडे धाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:41 IST

वडूज : वास्तविक पाहता कोरोना बाधितांवर जे उपचार सुरू आहेत, ते केवळ प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि आधारासाठी औषधोपचार होय. मात्र, ...

वडूज : वास्तविक पाहता कोरोना बाधितांवर जे उपचार सुरू आहेत, ते केवळ प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि आधारासाठी औषधोपचार होय. मात्र, काही बाधित रुग्णांना इतर आजाराने ग्रासल्यामुळे व भीतीपोटी खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल होत आहेत.

सध्या कोरोना संसर्गजन्य तपासण्या कमी होत असल्याने रुग्ण संख्येत घट दिसत आहे. मात्र, जेवढ्या तपासण्या होत आहेत, त्यापैकी पन्नास टक्के नागरिक पाॅझिटिव्ह येत असल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे. यातील इतर आजार असलेले रुग्ण भीतीपोटी खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल होत आहेत, तर इतर आजार नसलेले आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे, असेच बाधित शासकीय सेंटरला उपचार घेत आहेत. खासगी दवाखान्यात न जाण्याची अनेक कारणे असून, खटाव तालुक्यात याबाबत परिस्थिती थोडी वेगळी आहे. बाधित रुग्णांचा शासकीय यंत्रणेवर विश्वास जादा असल्याने व खासगी दवाखान्याची फी परवडणारी नसल्याने बहुतांश रुग्ण शासकीय कोरोना व कोविड सेंटरमध्येच उपचार घेताना आढळून येत आहेत. सध्या खटाव तालुक्यात आजअखेर १,११,४३८ रुग्ण कोरोनाने बाधित होते. यापैकी ९,९८६ रुग्ण बरे झालेले आहेत. यामध्ये ३१०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या १,१४६ बाधित रुग्ण ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. ९५४ बाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून, ३४६ बाधित रुग्ण पुसेगाव- ४७, पडळ - २५ व खटाव - ८० येथे कोरोना केअर सेंटरला उपचार घेत आहेत, तर १३४ बाधित रुग्ण मायणी, ३० बाधित रुग्ण औंध व ३० बाधित रुग्ण वडूज येथील कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. उर्वरित ४६ बाधित रुग्ण वडूज, सातारा, कोरेगाव व कर्‍हाड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

(चौकट)

नातेवाईकांचे अतोनात हाल...

जिल्ह्यात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून, खटाव तालुक्यातही बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या कोरोना संसर्ग आजाराबरोबरीने बुरशीच्या आजाराची लक्षणे दिसल्याने अनेक बाधित रुग्ण भयभीत झालेले आहेत. या उपचारासाठी त्यांचा कल खासगी दवाखान्याकडे वाढत आहे. परंतु खासगी दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच डिपाॅझिटची भरमसाठ रक्कम आकारली जात असल्याने नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत.

--------------