शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या नावाखाली गंडा, महिलेची फसवणूक : मुलांच्या शिक्षणासाठी हवे होते कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 13:52 IST

कमी व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून दोन फायनान्स कंपन्यांनी कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली महिलेची ४ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याबाबतची फिर्याद सुरेखा एकनाथ चव्हाण (वय ४५, रा. मोरया कॉम्प्लेक्स, कऱ्हाड -ढेबेवाडी रस्त्यालगत, मलकापूर) यांनी शहर पोलिसांत दिली आहे.

ठळक मुद्देकर्जाच्या नावाखाली गंडा, महिलेची फसवणूक मुलांच्या शिक्षणासाठी हवे होते कर्ज

कऱ्हाड  : कमी व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून दोन फायनान्स कंपन्यांनी कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली महिलेची ४ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याबाबतची फिर्याद सुरेखा एकनाथ चव्हाण (वय ४५, रा. मोरया कॉम्प्लेक्स, कऱ्हाड -ढेबेवाडी रस्त्यालगत, मलकापूर) यांनी शहर पोलिसांत दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथे मोरया कॉम्प्लेक्समध्ये सुरेखा चव्हाण या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे त्या कर्ज देणाऱ्या संस्थांच्या शोधात होत्या.

त्यातच मुद्रा फायनान्स कंपनीकडून १ ते ८० लाख रुपयांपर्यंतचे सर्व प्रकारचे कर्ज दोन टक्के व्याजदराने मिळेल, अशी जाहिरात सुरेखा चव्हाण यांना १७ नोव्हेंबर रोजी वाचनात आली. तसेच आॅल इंडिया फायनान्स कंपनीचेही दोन टक्के दराने कर्ज मिळेल, अशी आणखी एक जाहिरात त्यांच्या निदर्शनास आली.

सुरेखा चव्हाण यांनी संबंधित जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता समोरील व्यक्तीने आवश्यक कर्जाची रक्कम व ओळखपत्र व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवण्यास सांगितले. त्यासाठी त्या व्यक्तीने एक मोबाईल क्रमांकही दिला. त्यानंतर मुद्रा फायनान्स कंपनी ३० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करत असल्याचे चव्हाण यांना सांगण्यात आले. तर आॅल इंडिया फायनान्स कंपनीने ५ लाख रुपये कर्ज मंजूर करत असल्याचेही त्या व्यक्तीने सांगितले.कर्जासाठी चव्हाण यांनी सुमारे चार लाख एवढी रक्कम संबंधितांच्या खात्यावर भरली. मात्र, कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.चार लाख रुपये दोन खात्यांवर भरलेमुद्रा फायनान्स कंपनीच्या कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली सुरेखा चव्हाण यांना वेळोवेळी पैशाची मागणी केली. चव्हाण यांनी १७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर यादरम्यान ३ लाख ५९ हजार रुपये संबंधित मुद्रा फायनान्स कंपनीने सांगितलेल्या खात्यावर पाठवले. तसेच आॅल इंडिया फायनान्स कंपनीच्या मंजित कुमार याच्या खात्यावर ५२ हजार रुपये चव्हाण यांनी पाठवले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर