शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर विकास आराखड्यावर सत्ताधाऱ्यांत मतभेद

By admin | Updated: August 27, 2015 23:14 IST

विक्रम पाटील : महिन्याभरात आराखड्यास मंजुरी, राष्ट्रवादीला विरोधकांनी दिले आव्हान

अशोक पाटील -इस्लामपूरशहराच्या नियोजित विकास आराखड्याबाबत पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील काहीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र पालिकेकडून आराखड्यासंदर्भात सर्व पूर्तता करण्यात आली आहे. तो कधी मंजूर होईल, याबाबत काही माहीत नाही, असे ते सांगतात, तर नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी आराखडा सात दिवसात मंजूर होणार असल्याचे स्पष्ट करतात. भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमभाऊ पाटील मात्र विकास आराखडा मंजूर व्हायला महिना तरी लागेल, असे सांगत सत्ताधाऱ्यांना आव्हान देत आहे.सत्ताधारी राष्ट्रवादी आणि नगरपालिका प्रशासनाच्या आठमुठ्या धोरणामुळे विकास आराखड्याचे तीनतेरा वाजले आहेत. १९८० नंतरच्या विकास आराखड्याला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. या आराखड्यावर पालिकेने लाखो रुपये उधळूनही त्याला अंतिम स्वरूप आलेले नाही. सध्या हा आराखडा नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे. तो मंजूर होण्यासाठी माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी वजन खर्ची टाकल्याचे समजते. त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी गोपनीयरित्या केला असून, त्याला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश आल्याचेही समजते. परंतु या आराखड्यास कधी मंजुरी मिळणार, याबाबत सत्ताधाऱ्यांमध्येच मतभिन्नता आहे. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे नगरविकास खाते राष्ट्रवादीच्या नेत्यांना विकास आराखड्यासाठी उभेही करत नाही, असा आरोप भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी केला आहे. तथापि त्यांच्याच मदतीने सत्ताधाऱ्यांतील काही नेते हा आराखडा मंजूर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याचा विक्रम पाटील यांनी इन्कार केला आहे. विकास आराखड्यातील काही अन्यायी आरक्षणे काढूनच येत्या महिन्याभरात तो मंजूर होणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.या आराखड्याबाबत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांतही मतभिन्नता आहे. ज्यावेळी आराखडा मंजूर होऊन तो प्रसिध्द होईल, त्यावेळीच शहर मोकळा श्वास घेईल. त्याचवेळी गुंठेवारीचाही प्रश्न मार्गी लागणार आहे.विकास आराखड्याला अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्यास आहेत. तो कधी मंजूर होईल, याबाबत आपणास काहीही सांगता येणार नाही. आराखडा मंजूर झाल्यानंतर तो शासन संकेतस्थळावर प्रसिध्द करेल. त्यावेळीच याबाबतची माहिती देता येईल.- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी, इस्लामपूर, नगरपरिषद