शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

लोकनेते देसार्इंचे राज्यात मोलाचे योगदान : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:55 PM

लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रमुख भूमिका निभावली. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. अशा महान पुुरुषाचे स्मारक यापूर्वीच व्हायला पाहिजे होते,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्राचे जगात रेकॉर्ड; आघाडीने बंद पाडलेले प्रकल्पही सुरू केले

पाटण : ‘लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रमुख भूमिका निभावली. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. अशा महान पुुरुषाचे स्मारक यापूर्वीच व्हायला पाहिजे होते,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दौलतनगर-मरळी (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाचे उद्घाटन आणि पाटण तालुक्यात ५२ नवीन नळ योजनांच्या ई-भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, मंत्री सदाभाऊ खोत, मंत्री बबनराव लोणीकर, खासदार उदयनराजे भोसले, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजित पाटील, आमदार उदय पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार अनिल बाबर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, विजयादेवी देसाई, रविराज देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याचा जो भाग दुष्काळी आहे, तेथे पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू आहेत. राज्यातील गावे आणि वाड्या-वस्त्यांना रस्ते आणि पाणी योजना देण्यासाठी आम्ही लवकरच एक नवी योजना अंमलात आणणार आहे. तारळी धरणातून पन्नास मीटरच्यावर पाणी उचलून देणे, ही योजना अशक्य होती. मात्र, शंभूराज देसाई यांनी पाठपुरावा केल्यामुळेच २ हजार ५०० एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.’ खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी भाजपवर स्तुतीसुमने उधळली. तर आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. ‘भाजप आणि सेना सरकारच उत्कृष्ट असून, त्यांच्या मंत्रिमंडळात जे निर्णय झाले, ते यापूर्वी झाले नाहीत. यापूर्वी फक्त घोषणा झाल्या.लोकनेत्यांना पद्मभूषण द्या!लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. ते महसूल, बांधकाम, शिक्षण, गृहमंत्री आणि विधानसभेचे सभापती होते. तेव्हा लोकनेते बाळासाहेब देसाई यांना पद्म किंवा पद्मविभूषण पुरस्कार मिळावा. यासाठी मुख्यमंत्री आणि शासनाने केंद्राकडे शिफारस करावी. किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी करून मोरणा-गुरेघर उजवा कालवा बदल करणे आणि भूकंप दाखला निकष बदलणे तसेच वाड्या-वस्त्यांना रस्ते देण्यास येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी यावेळी आमदार शंभूराज देसाई यांनी केली. 

सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान होऊ दिले नाही!ज्यांनी देश उभा केला, त्या सरदार पटेल यांच्यावर राजकीय अन्याय झाला. त्यामुळे त्यांना पंतप्रधान होता आले नाही. त्याप्रमाणेच सर्व क्षमता असणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांना त्यावेळी राजकीय डावपेच करून मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

महिन्यानंतर माझे लग्न, नंतर तुम्हा सर्वांचे..खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ‘मी काय आहे, हे मला माहीत आहे. आणि तुम्हालाही. लोकनेते कुणाला म्हणायचे, हे लोकांनी ठरवायचे असते. एका बाजूला मुख्यमंत्री आणि माझ्या दुसºया बाजूला पालकमंत्री बसले आहेत. त्यामुळे माझी अवस्था उंदरासारखी झाली आहे; पण एक लक्षात ठेवा, एक महिन्यानंतर माझे लग्न आहे आणि नंतर तुमचे.’ उदयनराजेंच्या या मिश्किलीवर जोरदार हशा पिकला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस