शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरांना लागलेल्या वणव्यात वनसंपदा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST

वसंत ऋतूतल्या कडक उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या घशाला ओलावा म्हणून शहरातील लोक वेगवेगळ्या फळांचा रस घेत असतात. हा रानमेवा ...

वसंत ऋतूतल्या कडक उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या घशाला ओलावा म्हणून शहरातील लोक वेगवेगळ्या फळांचा रस घेत असतात. हा रानमेवा खाल्ल्याने शरीरात तरतरी येऊन पुन्हा काम करण्यास उत्साह येत असतो. वसंत ऋतू संपून ग्रीष्म ऋतूचे आगमन झाले असतानाही यावर्षी कऱ्हाड, उंब्रज, मसूर यासारख्या लहान-मोठ्या बाजारपेठेत तोरणे, धामणे, आवळा, चिंचा, जांभळे हा रानमेव दिसून आलाच नाही. हा रानमेवा व वनसंपदा नष्ट होण्यामागे वणव्याचे कारण आहे. एकंदरीत नेहमीच लागणाऱ्या वणव्यांकडे वन विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. हे वणवे वेळीच रोखले नाहीत, तर भविष्यात पाटण तालुक्यातून रानमेवा नष्ट होईल, अशी भीती आहे.

या वणव्यांमुळे जंगलातील दुर्मिळ औषधी वनस्पतींसह पशु-पक्ष्यांची घरटी व घरट्यांमधील त्यांची अंडी, पिले जळून जात आहेत. त्यामुळे पशु-पक्ष्यांचे अस्तित्वही संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, वन विभागाकडून जनजागृती करीत असताना, हे वणवे का लागतात, ते रोखण्यासाठी त्यावर अधिक उपाययोजना काय केल्या पाहिजेत याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही.

- चौकट

वनऔषधींसह फळझाडांवरही परिणाम

गत दोन ते तीन वर्षांपासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम डोंगररांगातून मिळणाऱ्या रानमेव्यांच्या झाडांवर झाला आहे. करवंदे, धामणे, तोरणे असा रानमेवा देणारी लहान झाडे वणव्याच्या आगीत जळून खाक होत आहेत. वणव्यांमुळे जांभूळ, चिंच, आवळा, आंबा या मोठ्या झाडांवरही परिणाम होऊन त्यांच्यापासून मिळणाऱ्या फळांचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. तसेच अनेक वनौषधी झाडे या वणव्यांमुळे नष्ट होत आहेत.