शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सदरबझारात डेंग्यू पसरतोय पाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

सातारा : कोरोनामुळे नागरिक हतबल झाले असतानाच आता सदर बझार परिसरात डेंग्यू सदृश रुग्ण आढळून येऊ लागल्याने आरोग्याचा प्रश्न ...

सातारा : कोरोनामुळे नागरिक हतबल झाले असतानाच आता सदर बझार परिसरात डेंग्यू सदृश रुग्ण आढळून येऊ लागल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. झोपडपट्टीतील अनेक नागरिक सध्या ताप व सांधेदुखीने त्रस्त आहेत. अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचारही घेतले. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी हिवताप विभागाने या परिसरात सर्व्हे करणे गरजेचे बनले आहे.

साताऱ्यातील सदर बझार झोपडपट्टी हा सर्वाधिक दाट लोकवस्तीचा परिसर. या ठिकाणी एक हजाराहून अधिक झोपड्या असून, सुमारे साडेचार हजार नागरिक येथे वास्तव्य करीत आहेत. उघडी गटारे, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, उघड्यावरून वाहणारे सांडपाणी अशा अनेक समस्यांमुळे येथील आरोग्य सेवेचा प्रश्न नेहमीच गंभीर बनलेला असतो. फेब्रुुवारी महिन्यात या ठिकाणी डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण आढळून आले होते. हिवताप विभागाच्या पथकाकडून येथे सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेत ७० पैकी १९ घरात तर १४७ पैकी ३४ कंटेनरमध्ये डेंग्यू व चिकनगुनियाच्या अळ्या आढळून आल्या होत्या.

आता पुन्हा एकदा सदरबझार परिसरात डेंग्यू व चिकनगुनिया सदृश आजाराने डोके वर काढले आहे. येथील अनेक नागरिक सध्या ताप, तीव्र सांधेदुखी, थकवा अशा आजाराने त्रस्त आहेत. काहीजणांनी शासकीय तर काहींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहे. एकीकडे कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सदरबझार येथे डेंग्यू व चिकनगुनिया सदृश रुग्ण आढळून येऊ लागल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

(पॉइंटर्स)

१. लक्ष्मीटेकडी परिसरात हिवताप विभागाकडून दि. ३ फेब्रुवारी रोजी सर्व्हे करण्यात आला होता.

२ यावेळी १९ घरांत व ३४ कंटेनरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या होत्या.

३. ‘हाऊस इंडेक्स’ने डास अळ्यांचे प्रमाण २७.१ इतके दर्शविले होते.

४. डास अळ्यांचे प्रमाण ‘हाऊस इंडेक्स’नुसार मोजले जाते. यासाठी हिवताप विभागाकडून घरांचा व पाण्याने भरलेल्या कंटेनरचा सर्व्हे केला जातो.

५. तपासलेली एकूण घरे व एकूण कंटेनरचा भागकार करून इंडेक्स काढला जातो.

६. निर्देशांक १० व त्यापेक्षा कमी असल्यास धोका कमी संभवतो. मात्र तो १० हून अधिक असल्यास धोक्याचे प्रमाण वाढते.

(कोट)

गेल्या काही दिवसांपासून सदरबझार परिसरातील नागरिकांना ताप, थंडी, सांधेदुखीचा त्रास जाणवू लागला आहे. ही सर्व डेंग्यू व चिकनगुनियाची लक्षणे असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना हाती घ्यावी.

- लक्ष्मण थोरात, सदर बझार

फोटो : २१ जावेद खान

साताºयातील सदर बझार येथील अनेक नागरिक ताप व सांधेदुखीने त्रस्त असून, काहीजण घरीच उपचार घेत आहेत. (छाया : जावेद खान)