शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या मागणीसाठी घाडगेवाडी शाळेला टाळे; विद्युत पुरवठाही खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 21:06 IST

घाडगेवाडी जिल्हा परिषद शाळेवर चार महिन्यांपासून नियमित शिक्षक नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांच्या संमयमाचा बांध मंगळवारी फुटला. शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाच्या मागणीसाठी घाडगेवाडी

ठळक मुद्दे चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने ग्रामस्थ संतप्त

शिरवळ : घाडगेवाडी जिल्हा परिषद शाळेवर चार महिन्यांपासून नियमित शिक्षक नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांच्या संमयमाचा बांध मंगळवारी फुटला. शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाच्या मागणीसाठी घाडगेवाडी शाळेला टाळे ठोकले.

याबाबत माहिती अशी की, घाडगेवाडी पाचशे लोकवस्तीचे गाव आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून, तेथे पहिली ते चौथीच्या वर्गात नऊ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. स्थापनेपासून दोन शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये एका शिक्षकाची नियमित बदली झाली आहे. तर एका शिक्षकाचे निधन झाले. त्यानंतर खंडाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून दररोज एका शाळेतील शिक्षक याठिकाणी पाठविले जातात, असा आरोप घाडगेवाडी ग्रामस्थांनी केला आहे.

घाडगेवाडी शाळेसाठी नियमित शिक्षकांची नेमणूक करावी, याबाबतची मागणी चार महिन्यांपासून ग्रामस्थ खंडाळा पंचायत समितीचे अधिकारी, लोकप्रतिनिधींकडे करत आहेत. आश्वासनापलीकडे काहीच न मिळाल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी अचानकपणे शाळेत येऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींना बाहेर काढून शाळेला टाळे ठोकले. यावेळी पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकारी गजानन आडे, नायगाव केंद्रप्रमुख शाहजहानबी शेख यांना संतापलेल्या ग्रामस्थांनी घेराव घालत प्रश्नांचा भडीमार केला. आडे, शेख यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु खंडाळा गटशिक्षणाधिकाºयांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय व शिक्षकांची नेमणूक केल्याशिवाय कुलूप काढणार नसल्याचा पवित्रा घेतला.तीन महिन्यांपासून वीज खंडितघाडगेवाडी शाळेचे वीजबिल तीन महिन्यांपासून थकीत राहिल्याने वीज कंपनीने वीजही तोडली आहे. याठिकाणी दररोज येणाºया शिक्षकांबरोबर विद्याथ्यानाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळाTeachers Recruitmentशिक्षकभरतीzp schoolजिल्हा परिषद शाळा