उड्डाणपुलाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST2021-01-14T04:32:06+5:302021-01-14T04:32:06+5:30

कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्यावर नवीन उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी केली जात आहे. पुणे-बंगलोर आशियाई महामार्गालगत कोल्हापूर नाका येथे ...

Demand for flyovers | उड्डाणपुलाची मागणी

उड्डाणपुलाची मागणी

कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्यावर नवीन उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी केली जात आहे. पुणे-बंगलोर आशियाई महामार्गालगत कोल्हापूर नाका येथे वारंवार अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर नाक्यावर कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या लेनवर उड्डाणपूल होण्याची गरज आहे.

तलाव तुडुंब

कऱ्हाड : तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने पाझर तलावात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. शामगाव, घोगाव व मोठ्या तलावांसह लहान तलावही पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावणार नाही.

फुटपाथची दुरवस्था

कऱ्हाड : शहरातील दत्त चौक ते कृष्णा नाका या मार्गादरम्यान रस्त्याकडेला असणाऱ्या पादचारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या पादचारी मार्गावर ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या फरशा फुटल्या आहेत. त्यामुळे खड्डे निर्माण झाले असून पादचाऱ्यांना यावरून प्रवास करताना धोका निर्माण होत आहे. पादचारी मार्गाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

पायी प्रवास (फोटो : १३इन्फोबॉक्स०२)

पाटण : पाटण तालुक्यातील काही ग्रामीण भागांत आजही रस्त्याच्या सुविधा नसल्यामुळे तेथील शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. या तालुक्यातील काही गावे डोंगर, जंगल क्षेत्रांत असल्यामुळे तेथे दळणवळण तसेच सुविधांची कमतरता आहे. या ठिकाणी शासनाकडून आवश्यक सुविधा पुरविणे गरजेचे आहे.

Web Title: Demand for flyovers