शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ईडीने संशयित दीपक देशमुख यांना घेतले ताब्यात, साताऱ्यातून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 14:05 IST

सातारा : मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणात फसवणुकीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यात सातारा आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी आलेल्या मायणी मेडिकल काॅलेजचे ...

सातारा : मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणात फसवणुकीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यात सातारा आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी आलेल्या मायणी मेडिकल काॅलेजचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने बुधवारी दुपारी साताऱ्यातून ताब्यात घेतले.दीपक देशमुख यांच्यावर मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणात २०२३ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, त्याचा तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले यांच्याकडे आहे. सातारा आर्थिक गुन्हे शाखेत तपासासाठी हजर राहण्यासह त्यांना अटी व शर्थीवर संबंधित गुन्ह्यात उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. तर दुसरीकडे दाखल एका अन्य गुन्ह्यात ईडी दीपक देशमुख यांच्या शोधात होती.दीपक देशमुख हे साताऱ्यात आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी जात असल्याची माहिती ईडीला मिळाली. त्यांची ४ सप्टेंबर रोजी हजेरी होती. या प्रकरणात दीपक देशमुख बुधवारी सकाळी ११ वाजता साताऱ्यातील आर्थिक गुन्हे शाखेत आले. तपासासाठी शाखेत गेल्यानंतर दोन मिनिटांमध्ये ईडीचे पथक एलसीबीच्या मागच्या बाजूच्या दरवाजातून आर्थिक गुन्हे शाखेत गेले. ‘हम ईडी विभाग से हैं,’ असे म्हणत त्यांचा ताबा घेत असल्याचे सांगितले. सुमारे दीड तास तेथेच चौकशी केल्यानंतर ईडीचे पथक त्यांना तेथून घेऊन गेले.ईडीकडून पोलिसांशी पत्रव्यवहार..दीपक देशमुख यांना ताब्यात घेतल्यानंतर ईडीने सातारा शहर पोलिसांना पोलिस बंदोबस्त मागणीचे पत्र दिले. त्यानंतर शहर पोलिसांनी त्यांना बंदोबस्त दिला. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुढील चाैकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले. त्यानंतर पथक मुंबईला गेले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय