शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक निवारा; पण हक्कासाठी आसरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 23:38 IST

तब्बल दीडशे इमारती मोडकळीस : घर सोडण्यास नागरिकांचा नकार; पालिकेला कार्यवाही करण्यात अडचणी

दत्ता यादव - सातारा  संपत्तीच्या वादातून भाऊबंदकीमध्येच अनेकदा टोकाचे संघर्ष होत असतात. हे संघर्ष इतके विकोपाला जातात की, जीव गेला तरी बेहत्तर पण संपत्ती मिळालीच पाहिजे, अशी वृत्ती सध्या जनमाणसांमध्ये दिसू लागली आहे. शहरामध्ये तब्बल दीडशे इमारती धोकादायक असल्याची धक्कादायक महिती उघड होऊनही पालिकेचा नाईलाज झाला आहे. कारण ज्या इमारतीवर धोकादायक असा शिक्का पडला आहे. त्या इमारतीमध्ये राहाणाऱ्या कुटुंबांचे हेवेदावे न्यायालयात गेल्यामुळे कोणीच माघारी घेत नाही. घर अंगावर केव्हाही कोसळण्याची शक्यता असतानाही केवळ घरावर हक्क राहावा, यासाठी अनेक कुटुंबे मृत्यूच्या सावलीखाली आपल्या संसाराचा गाडा हाकत असल्याचे विदारक चित्र साताऱ्यात समोर आले आहे.गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना सिटीपोस्टाशेजारील जुन्या इमारतीची भिंत कोसळून दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते. साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची दुर्घटना घडली होती. त्यामुळे जुन्या इमारतींचा मुद्दा आणि नागरिकांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याची चाहूल लागल्यानंतर पालिका प्रशासन शहरामध्ये किती इमारत धोकादायक आहे, याचा सर्व्हे करतेच ; परंतु या दुर्घटनेमुळे पालिका प्रशासनाने प्रकर्षाने याची गंभीर दखल घेतली आणि शहरातील दीडशेहून अधिक इमारती धोकादायक असल्याची बाब समोर आली. आता पुढे काय करायचे, असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. कारण परिस्थितीही तसीच आहे. घर खाली करा किंवा दुरूस्त करा, अशा स्वरूपाच्या नोटीसा पालिकेने प्रत्येकाला बजावल्या आहेत. परंतु या लोकांकडून पालिका प्रशासनाला कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्याची कारणेही अनेक आहेत. फार वर्षांपासून वास्तव्यास असणारे भाडेकरू, तसेच भाऊबंदकीचा वाद ही मुख्य कारणे आहेत. भाडेकरू व घरमालक तसेच भावांभावांतील वाद न्यायालयात गेल्यामुळे पालिका प्रशासनालाही कसलीही ठोस कारवाई करता येईना. केवळ धोक्याची सूचना देऊन कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करणेच पालिकेच्या हातात आता उरले आहे.घर कधीही कोसळू शकते, हे माहित असूनही अनेक कुटुंबे घर सोडायला तयार नाहीत. पालिकेच्या आदेशानुसार जर घर सोडलं तर पुन्हा ताबा मिळेल का, याची खात्री त्यांना वाटत नाही. घर मालकाने अथवा घरातील नातेवाईकाने जर पुन्हा घर बळकावले तर काय होईल, या विचारानेच अनेकजण अशा मोडकळीस आलेल्या घरामध्ये जीव मुठीत घेऊन जगत आहेत. अनेकजणांचे न्यायालयात दावे सुरू असल्यामुळे पालिकेलाही बळाचा वापर करता येत नाही. यदाकदाचित दुर्देवी घटना घडली तर याला पालिकेलाच जबाबदार धरले जाणार. त्यामुळे इकडे विहीर तिकडे आड, अशी स्थिती पालिका प्रशासनाची झाली आहे. जुने वाडे अन घरे..४शहरात प्रामुख्याने जुने वाडे आणि घरे मोडकळीस आली आहेत. अपार्टमेंट सुस्थितीत आहेत. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आणि अशा प्रकारच्या इमारती धोकादायक असल्याचे माहित असूनही प्रशासनाला काहीच करता येत नाही. इतकी हतबला प्रशासनाची स्पष्ट होत आहे.