शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा नदीचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: February 9, 2015 00:43 IST

राजेंद्रसिंह राणा : आपण आपण नदीची चिंता केली तरच नदी आपली करेल

भुर्इंज : ‘कृष्णामाई धोक्यात आहे. उगमाच्या अवघ्या काही अंतरापासून असणारी ही परिस्थिती चिंताजनक आहे. आपण नदीची चिंता केली, तरच नदी आपली करेल. वेळीच सावध झालो नाही, भूमिका घेतली नाही, तर या नदीला आपण वाचवू शकणार नाही,’ अशी भीती जागतिक जलतजज्ज्ञ तथा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी पाचवड, ता. वाई येथे बोलताना व्यक्त केली.गेली दोन दिवस डॉ. राजेंद्रसिंह वाई येथे होते. वाईहून पुण्याला जाताना त्यांनी पाचवड येथे येऊन कृष्णानदीची पाहणी केली. त्यांच्यासमवेत मीना राणा, मकरंद शेंडे, मंदार शेंडे उपस्थित होते. चिंधवलीचे माजी सरपंच जयवंत पवार यांच्याकडून त्यांनी नदीच्या सद्य:स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, ‘नदीच्या पात्रात येथे आता जलपर्णी दिसत आहे. ही जलपर्णी म्हणजेच, या नदीसाठी धोक्याची पहिली घंटा आहे. गावांनी जागरूक होऊन आपली नदी वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. ग्रामसेवकच्या धर्तीवर आता जलसेवक गावोगावी निर्माण झाले पाहिजेत. ते म्हणाले, ज्यांच्याकडे पाणीच नाही, ते पाण्यासाठी तडफडतायत. तुमच्यापाशी मुबलक आहे, ते फक्त वाचवण्याची खबरदारी घेतली पाहिजे. यावेळी वसंतराव जाधव, अप्पा मोहिते, विनायक गायकवाड, बबनराव काळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितहोते. (वार्ताहर)चिंधवलीत जलबिरादरीचे शिबिर जयवंत पवार यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, ‘तुमच्यासारख्या तरुणांनी या कामात सक्रिय झाले पाहिजे. ज्यांच्या मनात तळमळ आहे त्यांनी कृतिशील सहभाग या कामात घेतला पाहिजे. त्याला जयवंत पवार यांनी होकार देताच डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी चिंधवली येथे जलबिरादरीचे दोन दिवसांचे राज्यव्यापी शिबिर घेण्याची सूचना करून त्यावेळी आपण स्वत: पुन्हा एकदा येथे येऊ, असे सांगितले. त्यावर जलबिरादरीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील जोशी यांनी येत्या एक-दोन महिन्यांतच या शिबिराचे आयोजन करण्यात येईल,’ असे जाहीर केले.