साताऱ्यातील महिलांना दांडिया प्रशिक्षण

By Admin | Updated: September 16, 2014 23:56 IST2014-09-16T21:38:44+5:302014-09-16T23:56:23+5:30

नवरात्रौत्सव : अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन

Dandiya training for women in Satara | साताऱ्यातील महिलांना दांडिया प्रशिक्षण

साताऱ्यातील महिलांना दांडिया प्रशिक्षण

सातारा : इनरव्हील क्लब आॅफ सातारा सिटी आणि ‘लोकमत सखी मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी तीन दिवसीय दांडिया प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १९ ते २१ सप्टेंबर या दरम्यान सायंकाळी ४ ते ६ या वेळेत आयुष्यमान गर्भसंस्कार केंद्र, कदम पेट्रोल पंपासमोर, राधिका रोड, सातारा येथे नवरात्र उत्सवानिमित्त खास महिलांसाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
दांडिया हा सर्वांचाच आवडीचा विषय असून, त्याबद्दल योग्य ज्ञान व प्रशिक्षण महिलांना मिळावे, यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षण कालावधीमध्ये वेगवेगळ्या अनुभवी प्रशिक्षकांकडून महिलांना दांडियाचे वेगवेगळे प्रकार शिकविले जाणार आहेत.
इनरव्हील क्लब महिलांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असते.
महिलांनी सर्व क्षेत्रात प्रशिक्षित व्हावे, असा हेतू डोळ्यांसमोर ठेवून या प्रशिक्षण वर्गासाठी सखी मंच सभासदांना १०० व इतर महिलांसाठी १५० रुपये प्रशिक्षण शुल्क आकारले जाणार आहे. ठराविक महिलांना एक्सलंट अ‍ॅवार्ड देऊन गौरविण्यात येईल.
सखी मंच सभासदांसाठी नावनोंदणी करतेवेळी आपले ओळखपत्र आवश्यक आहे. पैसे भरून केलेली नावनोंदणीच ग्राह्य धरली जाईल. महिलांनी स्वत:च्या दांडिया स्वत: घेऊन याव्यात. महिलांनी नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी ‘लोकमत कार्यालय’ व ९९२२२४९९१४, ९७६२५२७१०९ या नंबरवर संपर्क साधावा. तरी अधिकाधिक महिलांनी दांडिया प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत सखी मंच’ आणि इनरव्हील क्लब आॅफ सातारा सिटी यांच्यातर्फे करण्यात आले
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dandiya training for women in Satara