शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

वाईतील दुकानांवर डल्ला मारणाऱ्यांची धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST

वाई : शहरातील गणपतीआळी परिसरात दोन दिवसांपूर्वी पाच दुकाने फोडून ५२ हजार ३०० रुपये लंपास केल्याप्रकरणी वाई पोलीस ...

वाई : शहरातील गणपतीआळी परिसरात दोन दिवसांपूर्वी पाच दुकाने फोडून ५२ हजार ३०० रुपये लंपास केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. नागरिकांमधील भीती कमी व्हावी, यासाठी या तिन्ही आरोपींची शहरातील प्रमुख रस्त्यावरुन गुरुवारी वरात काढण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, दुकाने फोडल्याप्रकरणी पोलिसांनी सनी सुरेश जाधव (वय २६), अक्षय गोरख माळी (२०), सागर सुरेश जाधव (२४, सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी, वाई) यांना अटक केली आहे. आरोपींची ओळख पटण्यासाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्या आरोपींची वाई शहरातून पायी धिंड काढली. भुरट्या चोऱ्या करून निर्माण केलेली दहशत मोडीन काढण्यासाठी बेड्या ठोकून शहरातील रस्त्यावरून या चोरट्यांची धिंड काढली.

सोमवार, दि. २२ च्या मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने शहरातील मध्यवस्तीत असलेले शशिकांत चंद्रकांत येवले (रा. भोगाव, ता. वाई) यांच्या मालकीच्या आम्रपाली बीअरबार व रेस्टॉरंट यांचे बंद शटर कटावणीच्या सहाय्याने उचकटून १४ हजार २०० रुपयांची रोख रक्कम तसेच शेजारील सुशांत संतोष गोळे यांचे साईकृपा कृषी केंद्राचे बंद शटर उचकटून १८ हजार, बिलाल इकबाल बागवान यांच्या किराणा दुकानातून ११ हजार रुपये, रवीचंद्र प्रदीप भाटे यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील तीनशे रुपये रोख व तीन आईस्क्रीमचे बॉक्स असा अठराशे रुपयांचा मुद्देमाल व नितीन रवींद्र शिंगटे यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातून ७ हजार रुपये रोख रक्कम याच चोरट्यांनी लंपास केली होती. तशी तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास गतिमान करण्यासाठी व आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे यांनी पथक तयार केले. या पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करीत सनी जाधव, अक्षय माळी, सागर जाधव तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पाचही दुकाने फोडली असल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने १७ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली. शहराच्या मध्यवस्तीमध्ये झालेल्या या चोऱ्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची वाई शहरातून धिंड काढण्यात येऊन व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचे काम करण्यात आले.