शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे प्रतिबंध अन् उघडकीस आणणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 23:04 IST

आपल्या आजूबाजूला काय घडतंय, यावर प्रत्येकाचं लक्ष असायला हवं. पोलिसांचे कान, नाक, डोळा ही सर्वसामान्य जनताच आहे. - सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा.

ठळक मुद्देमुंबईतील डिटेक्शनचा अनुभव येणार कामी चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

दत्ता यादव।सातारा : नवी मुंबई आणि ठाणे येथील क्राईम ब्रँचमधील डिटेक्शनचा अनुभव पाठीशी असल्यामुळे साताऱ्यात काम करणे फार अवघड जाणार नाही. तेथील अनुभव इथे कामी येणार आहे. गुन्हे उघडकीस आणणे आणि गुन्हेगारांवर ्रवचक ठेवून त्यांच्यावर प्रतिबंध घालणे हे धोरण साताºयात राबविले जाणार आहे. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्याशी केलेली बातचित..

  • प्रश्न : स्थानिक गुन्हे शाखेच्या संदर्भात तुमचे धोरण काय असणार?

उत्तर : गुन्हे डिटेक्शनवर भर दिला जाणार आहे. सातारा जिल्ह्यात गावोगावी खबऱ्यांचे नेटवर्क पुन्हा नव्याने उभारले जाणार आहे. तसेच गुन्हे घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला जाणार आहे. गुन्हे उघडकीस आणताना त्या गुन्ह्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. तर त्याची उकल होते. या धोरणाला प्राधान्य असेल.

  • प्रश्न : तुमच्या शाखेकडे कोणते गुन्हे सध्या डिटेक्शनसाठी आहेत?

उत्तर : अलीकडे आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. गुन्हे घडल्यानंतर त्याचा शोध लावण्यापेक्षा ते घडूच नयेत, यासाठी जनजागृतीद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये मोठी अफरातफर असते. याचा बारकाईने तपास करावा लागतो. जिल्ह्यात खासगी सावकारीचेही प्रमाण दिसत आहे. हे रोखण्यासाठी कारवाईचे कडक धोरण अवलंबले जाणार आहे.

  • प्रश्न : एलसीबीकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ आहे का?

उत्तर : हो नक्कीच आहे. साताºयाची एलसीबीची टीम अत्यंत संवेदनशील आहे. या टीमचे नेटवर्क वाखाण्याजोगे आहे. तळागाळातील लोकांशी असलेला संपर्क आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या पद्धतीमुळे ही टीम क्रियाशील वाटते. कोणतेही काम टीमवर्कने केल्याने त्याचा आनंद घेता येतो. ही टीम नक्कीच गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरेल. आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुन्हेगारांचे जाळे शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.राष्ट्रपती पोलीस पदकही..पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील हे बार्शी, सोलापूरहून साताºयात आले आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई, ठाणे, बारामती, पुणे या ठिकाणी उत्कृष्ट काम केले आहे. याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकही बहाल करण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट डिटेक्शनमुळे पोलीस महासंचालकांकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मुंंबईसारख्या महानगरामध्ये काम करीत असताना त्यांनी ७५ रॉबरीपैकी ५३ गुन्हे उघडकीस आणले होते. इतरांचा तपास सुरू असून त्याला लवकरच यश येईल.

अकरा आरोपींना सक्तमजुरीची शिक्षाठाणे मध्यवर्ती बँकेतून सहा लाखांची रोकड चोरीस गेली होती. त्यामध्ये अकरा आरोपींना त्यांनी शिताफीने पकडले होते. या अकराही आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. तसेच हिंगोली जिल्ह्याातील वसमत हे पोलीस ठाणे अत्यंत सेंसिटिव्ह आहे. या ठिकाणीही पाटील यांनी काम केले आहे. विविध आंदोलने त्यांनी कसलीही हिंसा न होता उत्कृष्टरीत्या हातळली आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस