शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी आदेशभंग प्रकरणी हॉटेलचालकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन हॉटेल मालकांविरुद्ध शिरवळ ...

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन हॉटेल मालकांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ हद्दीमध्ये शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश वळवी, पोलीस हवालदार नवनाथ कोळेकर हे रात्रगस्त करीत असताना महामार्गालगत असणारे हॉटेल वेलकम बिर्याणी हाऊस हे बारा वाजण्याच्या दरम्यान विनाकारण सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी हॉटेलमध्ये ४ ते ५ व्यक्ती जेवण करीत होते.

यावेळी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रात्रीच्या दरम्यान जारी केलेल्या संचारबंदीचा हॉटेल मालक विशाल मोहन गायकवाड याने भंग केल्याचे निदर्शनास आले. हॉटेल मालक विशाल गायकवाड याच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महामार्गालगत असणाऱ्या एका वडापाव सेंटरलगत असणाऱ्या हॉटेल मराठी बाणा विनाकारण सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने हॉटेल मालक कौशल राजेंद्र देशमुख (वय २१, रा. फुलमळा, शिरवळ ता. खंडाळा) याच्याविरुद्ध जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार नवनाथ कोळेकर यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे. या घटनेचा सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश वळवी तपास करीत आहेत.