शहरं
Join us  
Trending Stories
1
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
2
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
3
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
4
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
5
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
6
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
9
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
10
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
11
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
12
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
13
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
14
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
15
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
16
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
17
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
18
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
19
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :जिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 15:10 IST

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा रुद्रावतार सुरूच असून, बुधवारी जिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे बळी गेला तर १५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तसेच २०८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, त्यामध्ये मृत्यू पावलेल्या तीन कोरोना संशयितांचाही समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता २४ वर पोहोचला असून, बाधितांची संख्या ५७१ झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे बळीनवे १५ रुग्ण बाधित ; २०८ जणांचे अहवालही निगेटिव्ह

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा रुद्रावतार सुरूच असून, बुधवारी जिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे बळी गेला तर १५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तसेच २०८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, त्यामध्ये मृत्यू पावलेल्या तीन कोरोना संशयितांचाही समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता २४ वर पोहोचला असून, बाधितांची संख्या ५७१ झाली आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची आणि बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फलटण तालुक्यातील कोळकी येथील मुुंबईवरून प्रवास करून आलेल्या ५४ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. तसेच तीनजणांच्या मृत्यू पश्चात अहवालाबरोबरच २०८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामध्ये वाई तालुक्यातील भोगाव येथील ८५ वर्षीय महिला, गिरवी, ता. फलटण येथील ६५ वर्षीय महिला तसेच वेळेकामथी, ता. सातारा येथील ५९ वर्षीय पुरुषाचा त्यामध्ये समावेश आहे.

नवे १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून, तालुकानिहाय आकडेवारी अशी, सातारा (२)- वावदरे, ४५ वर्षीय महिला माणगाव-अतीत ३५ वर्षीय पुरुष, कोरेगाव-(३) कठापूर ६२ वर्षीय पुरुष, २४ व ५५ वर्षीय महिला, जावळी- (३) वाहगाव ३४ वर्षीय पुरुष, काटवली २९ वर्षीय पुरुष व ५६ वर्षीय महिला, पाटण-(३) जांभेकरवाडी दोन वर्षीय बालक, दिवशी मारुली २९ वर्षीय पुरुष, नवसरी ५५ वर्षीय सारी आजाराचा पुरुष, खंडाळा-(१) शिरवळ ५५ वर्षीय महिला, माण-(१) दहिवडी १९ वर्षीय युवक, कऱ्हाड (१) तुळसण ६२ वर्षीय सारी आजाराचा पुरुष, फलटण-(१) कोळकी ५४ वर्षीय सारी आजाराचा पुरुष अशा १५ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, मुंबई येथे खासगी प्रयोगशाळेत तपासणी करून आलेल्या दिवड, ता. माण येथील २९ वर्षीय महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला असून, सध्या या महिलेवर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत ५७१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर २४ कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. त्यामुळे सध्या ३२४ कोरोना बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर