शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची आज वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

सातारा : गतवर्षी २३ मार्चला सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. आज ...

सातारा : गतवर्षी २३ मार्चला सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. आज या घटनेला बरोबर एक वर्ष होत असून, त्यावेळी जिल्हा प्रशासनाने नेमकी कशी तयारी केली होती हे आजही अनेकांच्या डोळ्यांसमोरून तरळून जाते.

जगभरात कोरोनाने हाहाकार माजविल्यानंतर गतवर्षी २३ मार्चला साताऱ्यातही पहिला रुग्ण आढळून आला होता. दुबईवरून आलेल्या एका ४५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. संबंधित महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलीनीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. या महिलेच्या देखरेखीसाठी विशेष म्हणजे तब्बल सहा पथके तैनात करण्यात आली होती. पहिलाच रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते. नेमका कसा उपाय करायचा यावर जिल्हा प्रशासनाच्या बैठका सुरू होत्या. संबंधित महिलेच्या संपर्कात साताऱ्यातील कोणत्या व्यक्ती आल्या याची प्रशासनाकडून तातडीने माहिती घेण्यात आली. एवढेच नव्हे, तर खेड परिसर सील करण्यात आला. त्या परिसरातील रस्तेही अडविण्यात आले. इतकी प्रचंड खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली होती. कोरोना हा परदेशातून भारतात प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये अगोदरच भीती होती. त्यातच साताऱ्यातही सापडलेला पहिला रुग्ण दुबईहून आला होता. त्यामुळे नागरिक आणखीनच अस्वस्थ झाले होते. या महिलेच्या अहवालानंतर दोन दिवसांत तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हळूहळू एकाचे दोन अशी रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात येणारे रस्ते पूर्णपणे बंद केले. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत होता. सुरुवातीला कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने टम फ्ल्यूच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जात होत्या, तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून प्रचंड खबरदारी घेतली जात होती. रस्त्यावर कोणालाही फिरकू दिले जात नव्हते. तोंडाला मास्क न लावणाऱ्यावर प्रसंगी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. केवळ कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न केले गेले. मात्र, त्यानंतरही वर्षभर कोरोनाची रुग्ण संख्या मात्र कमी झाली नाही.