गावच्या विकासासाठी योजनांची सांगड घालावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST2021-01-08T06:08:21+5:302021-01-08T06:08:21+5:30

शिरवळ : ‘ग्रामपंचायतींना उपलब्ध होणाऱ्या निधीतून आजपर्यंत मूलभूत भौतिक सुविधांच्या निर्मितीकडे भर देण्यात आला. पण शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मितीसारख्या ...

Coordinate plans for village development | गावच्या विकासासाठी योजनांची सांगड घालावी

गावच्या विकासासाठी योजनांची सांगड घालावी

शिरवळ : ‘ग्रामपंचायतींना उपलब्ध होणाऱ्या निधीतून आजपर्यंत मूलभूत भौतिक सुविधांच्या निर्मितीकडे भर देण्यात आला. पण शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मितीसारख्या मानव विकासाच्या उपक्रमांकडे पुरेसे लक्ष दिले नाही. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या निधी तसेच विविध योजनांची आपापसात सांगड घालून ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करावा,’ असे आवाहन राज्य ग्रामीण विकास यंत्रणा (यशदा) पुणेचे मास्टर ट्रेनर स्वप्नील शिंदे यांनी केले.

‘आमचं गाव, आमचा विकास’ योजनेंतर्गत खंडाळा पंचायत समितीच्यावतीने भादे (ता. खंडाळा) येथे आयोजित गणस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी विस्ताराधिकारी सदाशिव घोलप, महिला व बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षिका छाया मगदूम, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वप्नील शिंदे म्हणाले, ‘पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या निधीमधून ५० टक्के निधी बंधित स्वरुपाचा आहे. त्यामधून स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा, हागणदारीमुक्त उपक्रमांची देखभाल-दुरुस्ती, पिण्याचे पाणी, पावसाचे पाणी संकलन व पुनर्वापर याच घटकांसाठी विनियोग करायचा आहे. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत बंधित स्वरुपातील निधी हा सद्यस्थितीत पाणी पुरवठ्याच्या कामांसाठी प्राधान्याने वापरणे गरजेचे आहे. त्यातून ग्रामपंचायतीने १०० टक्के घरगुती नळजोडणी देण्यासाठी वापरण्यात यावा, तर उर्वरित ५० टक्के निधी अबंधित स्वरुपाचा राहणार आहे. त्यामध्ये आरोग्य, शिक्षण व उपजीविका या उपक्रमांसाठी २५ टक्के, महिला व बालकल्याण उपक्रमांसाठी १० टक्के, मागासवर्गीय लोकसंख्येच्या प्रमाणात करायची आहे.

५० टक्केपैकी ज्या बाबी मानव विकासाशी अगर इतर बाबींशी संबंधित असतील, त्या बाबींचा खर्च त्या शिर्षाअंतर्गतही दर्शविण्यात यावा. अशाप्रकारे कामांची निवड व अंमलबजावणी करून गावामध्ये समृद्धी आणण्याच्या दृष्टीने काम करायचे आहे.’

यावेळी भादे परिसरातील पाडेगाव, पिंपरी, बाळूपाटलाचीवाडी, आंदोरी आदी १२ गावांतील विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास आधिकारी एम. एन. दळवी यांनी प्रास्ताविक केले. व्ही. टी. माने यांनी सूत्रसंचालन केले. एस. व्ही. क्षीरसागर यांनी आभार मानले. यावेळी ग्रामविकास आधिकारी एम. एन. दळवी यांनी प्रास्ताविक केले. व्ही. टी. माने यांनी सूत्रसंचालन केले. एस. व्ही. क्षीरसागर यांनी आभार मानले. यावेळी ग्रामविकास आधिकारी एम. एन. दळवी यांनी प्रास्ताविक केले. व्ही. टी. माने यांनी सूत्रसंचालन केले. एस. व्ही. क्षीरसागर यांनी आभार मानले.

Web Title: Coordinate plans for village development