शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सेव्हन स्टार मल्टिप्लेक्सचे बांधकाम बेकायदा : शेंडे

By admin | Updated: February 2, 2015 23:49 IST

त्यावेळी इमारतीचे बांधकाम बेकायदा आहे, हे लक्षात आले. त्या अनुषंगाने दि. ११ जून २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली. त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते.

सातारा : ‘येथील बसस्थानक परिसरात एमएसआरटीसीच्या माध्यमातून ‘बीओटी’ तत्त्वावर कमर्शियल इमारत ‘सेव्हन स्टार मल्टिप्लेक्स’ या नावाने महाराजा प्रमोटर्स बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स (महेंद्र चव्हाण) हे बांधत आहेत. या इमारतीची जागा ही सत्ता प्रकार ‘ब’ आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा काही अटींवर दि बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्टला दिली आहे. या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ही इमारत बांधली जात आहे. हे बांधकाम बेकायदा आहे,’ असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष शेंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.यासंबंधी आपण आतापर्यंत कोणाकोणाशी पत्रव्यवहार केला याची कागदपत्रे दाखवून शेंडे म्हणाले, ‘या इमारतीबाबत पालिकेतून माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागविली होती. त्यावेळी इमारतीचे बांधकाम बेकायदा आहे, हे लक्षात आले. त्या अनुषंगाने दि. ११ जून २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली. त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, त्यावर गेल्या सहा महिन्यांत काहीही कार्यवाही झालेली नाही. तसेच दि. २७ जून २०१४ रोजी दि बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट आणि मुख्यमंत्री, नगरपालिका मुख्याधिकारी व इतरांकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती. त्यावरही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता लोकशाही दिनात अर्ज दाखल केला आहे. शहरात अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांच्या टपऱ्या काढून पर्यायी व्यवस्था न करता त्यांना रस्त्यावर आणले जात आहे. परंतु, धनदांडग्यांचे बेकायदा बांधकाम मात्र अनेकदा तक्रारी करूनही काढले जात नाही, हे दुर्दैवी आहे. म्हणूनच संबंधित बांधकाम बेकायदा असल्याचे निदर्शनास आणूनही पालिका, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व शासनानेही दखल घेतली नाही.’ (प्रतिनिधी)बंदोबस्तात अतिक्रमण काढणार : शिवेंद्रसिंहराजे‘सातारा शहरातील रस्ता रुंदीकरणासाठी शहरातील अतिक्रमणे हटविली जात आहेत. रविवार पेठेतून या मोहिमेला विरोध आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात तेथील अतिक्रमणे काढावीत,अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत,’ अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘सातारा शहरात तलाठ्यांसाठी सुसज्ज भवन नाही, त्यांची समस्या लक्षात घेऊन पोवई नाक्यावरच तलाठी भवन उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविला असून, पाठपुरावा करत आहे.’ या जागेची मूळ मालकी एसटी महामंडळाची असून, शासनाच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच आराखडा मंजूर करून घेऊन बांधकाम केले आहे. शेंडे यांनी सूडबुद्धीतून आरोप केले आहेत. - महेंद्र चव्हाण, आर्किटेक्ट