शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामात काँक्रिट पक्केच हवे

By admin | Updated: February 8, 2015 00:53 IST

ए. डी. बालाजी : वास्तुविश्व प्रदर्शनाचा दुसरा दिवस; चर्चासत्राला प्रतिसाद

कऱ्हाड : ‘इमारतींचे बांधकाम करत असताना काँक्रिटीकरण महत्त्वाचा घटक असतो, त्यामुळे इमारतीची मजबुती व दीर्घकाळ टिकण्याची क्षमता लक्षात येते. आजच्या काळात बांधकाम क्षेत्रात काँक्रिटीकरण इंजिनिअर व आर्किटेक्चर यांच्या दृष्टीने वापरणे गरजेचे आहे,’ असे मत इलेक्ट्रॉनिक इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर ए. डी. बालाजी यांनी व्यक्त केले. दि कऱ्हाड आर्किटेक्ट आणि इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘वास्तूविश्व २०१५’ प्रदर्शनाच्या काँक्रिट या विषयावरील आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड आर्किटेक्ट व इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद खबाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. मॅनेजिंग डायरेक्टर बालाजी म्हणाले, ‘बांधकाम क्षेत्रात काँक्रिटीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. इमारतीच्या पायाभरणीपासून ते प्रत्येक गोष्टीत काँक्रीटचा वापर होतो. आर्किटेक्चर व इंजिनिअरकडून महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी बांधकामात वापरला जाणारा सिमेंटचा दर्जा, पाणी वापराची क्षमता अशा गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. इमारत बांधकामासाठी शक्यतो काँक्रिट हे मशीननेच मिक्स करून वापरावे, जेणेकरून ते जास्त एकजीव होऊन इमारत बांधकाम वापरास सोयीस्कर ठरेल.’बांधकामात प्लास्टिक व लोखंडी या दोन्ही गोष्टींना महत्त्व दिले जाते. इमारत बांधताना इंजिनिअर व आर्किटेक्चर्सनी चांगल्या व उत्तम दर्जाचे मटेरिअल वापराबरोबर उत्तम व कुशल असा कामगारवर्गाचा वापर करावा, असा सल्ला इलेक्ट्रॉनिक इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर ए. डी. बालाजी यांनी चर्चासत्रावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. अरविंद खबाले म्हणाले, ‘इंजिनिअर व आर्किटेक्चर क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. पुस्तकी ज्ञानाला महत्त्व देण्याबरोबर प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जास्त ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. कऱ्हाड इंजिनिअर व आर्किटेक्चर असोसिएशनच्या माध्यमातून इंजिनिअर क्षेत्रातील विविध चर्चासत्रातून माहिती देण्याचे काम केले जाते. त्यांचा लाभ विद्यार्थ्यांना भविष्यकाळात होतो.’ यावेळी इलेक्ट्रॉनिक इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर बालाजी यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती दिली.भविष्यातील इंजिनिअर्सची प्रदर्शनाला भेट ‘वास्तुविश्व २०१५’ या इंजिनिअर व आर्किटेक्चर क्षेत्रातील प्रदर्शनास येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट दिली व चर्चासत्रास उपस्थिती लावली. या प्रदर्शनानिमित्त खऱ्या खुऱ्या इंजिनिअर्स व आर्किटेक्चरचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना यावेळी लाभले.