काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी, ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST2021-02-25T04:52:03+5:302021-02-25T04:52:03+5:30

सातारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधींच्या निवडी जाहीर केल्या आहेत. याची अधिकृत माहिती ...

Congress announces election of region representatives, block presidents | काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी, ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी जाहीर

काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी, ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी जाहीर

सातारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधींच्या निवडी जाहीर केल्या आहेत. याची अधिकृत माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, वाई तालुका प्रदेश प्रतिनिधी निवड तसेच सातारा शहर आणि माण ब्लॉक अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही.

काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातून जाहीर करण्यात आल्यानुसार तालुकानिहाय प्रदेश प्रतिनिधी म्हणून अजितराव पाटील (कऱ्हाड उत्तर), उदयसिंह पाटील (कऱ्हाड दक्षिण), पृथ्वीराज चव्हाण (कऱ्हाड शहर), सचिन सूर्यवंशी (फलटण ग्रामीण), राजेंद्र शेलार (फलटण शहर), ॲड. बाळासाहेब बागवान (खंडाळा), बाबुराव शिंदे (जावळी), रजनी पवार (सातारा ग्रामीण), अन्वर पाशा खान (सातारा शहर), अशोक गोडसे (खटाव), बाळासाहेब माने (माण), हिंदूराव पाटील (पाटण), ॲड. विजय कणसे (कोरेगाव), रणजित देशमुख (महाबळेेश्वर) यांचा समावेश करण्यात आला आहे.

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ब्लॉक अध्यक्षांचीही निवड करण्यात आली असून सातारा शहर आणि माण रिक्त ठेवले आहे. दरम्यान, ब्लॉक अध्यक्ष म्हणून निवडी झालेल्यांमध्ये हेमंत जाधव (कऱ्हाड उत्तर), मनोहर शिंदे (कऱ्हाड दक्षिण), राजेंद्र माने (कऱ्हाड शहर), महेंद्र सूर्यवंशी (फलटण ग्रामीण), पंकज पवार (फलटण शहर), एस. वाय. पवार (खंडाळा), विक्रम तरडे (जावळी), आनंदराव उर्फ नंदाभाऊ जाधव (सातारा ग्रामीण), विवेक देशमुख (खटाव), पांडुरंग यादव (पाटण), श्रीकांत चव्हाण (कोरेगाव), नंदू बावळेकर (महाबळेेश्वर), रवी भिलारे (वाई) यांचा समावेश आहे.

Web Title: Congress announces election of region representatives, block presidents